घरमहाराष्ट्रपुणेAtal Setu : अटल सेतूवरून धावणार 'शिवनेरी', या मार्गावर सुरू होणार बस

Atal Setu : अटल सेतूवरून धावणार ‘शिवनेरी’, या मार्गावर सुरू होणार बस

Subscribe

मुंबई : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी शिवडी ते नाव्हाशेवा दरम्यान “अटल सेतू” बांधण्यात आला आहे. या सागरी पुलाला प्रवाशांनी फारशी पसंती दिली नसली तरी या पुलावरून प्रवास करण्याची अनेकांची इच्छा आहे. असे असताना महाराष्ट्र एसटी मंडळाने अटल सेतूवरून एसटीची शिवनेरी बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर उद्या मंगळवारी, 20 फेब्रुवारीपासून पुणे स्टेशन ते मंत्रालय आणि स्वारगेट ते दादर अशी बससेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे गर्दीच्या वेळी प्रवासाचा सुमारे एक तास वाचणार आहे. तर याबाबतची संपूर्ण माहिती आणि आरक्षणासाठीची प्रक्रिया एसटीच्या अधिकृत msrtc mobile reservation ॲप वर व http://www.msrtc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Shivneri bus will run from Atal Setu, Pune-Mumbai route)

हेही वाचा… Vistadome Coach : विस्टाडोम कोचची प्रवाशांना भुरळ, मध्य रेल्वेने कमावला ‘इतका’ महसूल

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मुंबई-पुणे शिवनेरी बस अटल सेतूवरून चालवण्यासंदर्भात चाचपणी सुरू होती. शिवनेरी बस मुंबईतून सुटताना त्यामध्ये 45 प्रवाशी असतील तर बस अटल सेतूवरून नेण्यात येईल, असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु, आता प्रवासी संख्येची कोणतीही अट न ठेवता उद्यापासून दररोज सकाळी पुण्यावरून मुंबईला दोन शिवनेरी बसेस रवाना होतील. मुंबईवरून पुण्याला जाताना अटल सेतूचा वापर केला तर पनवेल एसटी स्थानक वगळावे लागणार आहे. पनवेलसह अन्य लहान-मोठे थांबेही घेता येणार नाहीत. त्यामुळे आता शिवनेरी बस अटल सेतूवरून नेण्याचा निर्णय कितपत यशस्वी ठरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रायोगिक तत्त्वावर उद्या दिनांक 20 फेब्रुवारीपासून पुणे स्टेशन -मंत्रालय (सकाळी 6.30 वाजता) व स्वारगेट- दादर (7.00 वाजता) या दोन मार्गावर शिवनेरी बस सुरू करण्यात येणार आहे. या बसेस पुणे येथून निघून थेट पनवेल नाव्हाशेवा, शिवडी मार्गे मंत्रालय/दादर येथे पोहोचतील. त्यानंतर पुन्हा 11 वाजता याचमार्गे अनुक्रमे मंत्रालय व दादर येथून निघतील. तर पुणे-मुंबई मार्गावर जे तिकीट दर एसटीकडून आकारले जातात, तेच तिकीट दर या मार्गावरून प्रवास करतानाही आकारण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी या सेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -