घरक्राइमSalman Khan house Firing Case : शस्त्रे पुरविणार्‍या दोघांनाही 30 एप्रिलपर्यंत कोठडी

Salman Khan house Firing Case : शस्त्रे पुरविणार्‍या दोघांनाही 30 एप्रिलपर्यंत कोठडी

Subscribe

सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराजवळील झालेल्या गोळीबारप्रकरणी पंजाब येथून अटक केलेल्या दोन्ही आरोपींना किल्ला न्यायालयाने 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबई : सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराजवळील झालेल्या गोळीबारप्रकरणी पंजाब येथून अटक केलेल्या दोन्ही आरोपींना किल्ला न्यायालयाने 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सोनूकुमार सुभाषचंद्र बिष्णोई आणि अनुजकुमार ओमप्रकाश थापन अशी या दोघांची नावे असून ते दोघेही पंजाबच्या फाजिलका, अबोहर, सुखचैन गावचे रहिवाशी आहेत. या दोघांनी गोळीबारासाठी विकीकुमार गुप्ता आणि सागरकुमार पाल यांना शस्त्रे पुरविल्याचा आरोप आहे. (Salman Khan house Firing Case Both arms suppliers remanded till April 30)

या गुन्ह्यांत अनमोल बिष्णोई याला वॉन्टेड आरोपी दाखविण्यात आले असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी लुक आऊट नोटीस बजाविली आहे. त्यानेच गोळीबारानंतर हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती. 14 एप्रिलला सलमान खान याच्या वांद्रे येथील बी. जे रोड, गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये बाईकवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला होता. पाच ते सहा गोळ्या झाडल्यानंतर दोन्ही आरोपी बाईकवरून पळून गेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या दोन्ही शूटर विकीकुमार आणि सागरकुमार या दोघांनाही गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी गुजरातच्या भूज शहरातून अटक केली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Crime News: विवाहित महिलेची आत्महत्या; पती आणि सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल

याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्या चौकशीत त्यांना सोनूकुमार आणि अनुजकुमार या दोघांनी शस्त्रे दिल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली होती. ही शोधमोहीम सुरू असताना या दोघांनाही गुरुवारी पंजाबच्या संगरुर, भवानी गड येथून गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर शुक्रवारी त्यांना पोलीस बंदोबस्तात किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने सोनूकुमार आणि अनुजकुमार या दोघांनाही मंगळवार 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत अनमोल बिष्णोई याला वॉन्टेड आरोपी दाखविण्यात आले असून त्याच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस बजाविण्यात आली आहे.

- Advertisement -

ऑनलाइन फसवणुकीची एक कोटीची रक्कम वाचविण्यात सायबर सेलला यश

मुंबई : ऑनलाइन फसवणुकीची एक कोटी दोन लाख रुपयांची रक्कम वाचविण्यात मुंबई पोलिसांच्या सायबर सेल पोलिसांना यश आले आहे. लवकरच ही रक्कम संबंधित तक्रारदाराच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

गेल्या काही दिवसांत शेअर ट्रेडिंग आणि फेडेक्स कुरिअरच्या नावाने फसवणुकीचे प्रकार घडत होते. अशाच प्रकारे वांद्रे आणि कांदिवली परिसरात राहणार्‍या दोन तक्रारदारांची अज्ञात सायबर ठगांनी शेअर ट्रेडिंग आणि फेडेक्स कुरिअरच्या माध्यमातून ऑनलाइन फसवणूक केली होती. या दोघांकडून कोट्यवधी रुपयांचा अपहार करून या ठगांनी त्यांची फसवणूक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर सेलमध्ये ऑनलाइन तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांची सायबर सेल पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात आली.

हेही वाचा – Crime News: शहरात दोन अपघातात महिलेसह दोघांचा मृत्यू, कांदिवली-गोरेगावातील घटना

जबानीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर, बाविस्कर, सिंग, शिखरे, दळवी, शिंदे, भावसार यांनी तपास सुरू केला होता. संबंधित बँक खात्याची माहिती काढून संबंधित नोडल अधिकार्‍यांना या खात्यातील व्यवहार थांबविण्याची विनंती केली होती. या विनंतीनंतर या अधिकार्‍यांनी या बँक खात्यातील 1 कोटी 2 लाख रुपये फ्रिज केले होते. ही रक्कम लवकरच तक्रारदारांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -