घरक्राइममुंबईतील शिवसेना आमदाराला सेक्सटोर्शन रॅकेटमध्ये अडकवत धमकावण्याचा प्रयत्न, पोलिसांत गुन्हा दाखल

मुंबईतील शिवसेना आमदाराला सेक्सटोर्शन रॅकेटमध्ये अडकवत धमकावण्याचा प्रयत्न, पोलिसांत गुन्हा दाखल

Subscribe

मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे यांना सेक्सटोर्शन रॅकेटमध्ये अडकवत धमकावण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी प्रकाश सुर्वे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आमदार प्रकाश सुर्वे यांना एका अज्ञात व्यक्तीने त्यांना अश्लील व्हिडिओ कॉल केलाचा दावा केला आहे. तसेच या व्हिडिओमध्ये एक महिला अश्लील कृत्य करताना दिसत होती. यानंतर याच नंबरवरून एका व्यक्तीने व्हिडीओ मोर्फ करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केल्याचा प्रयत्न केल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

याप्रकरणी ४ डिसेंबर रोजी दहिसर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ५०० (बदनामी), ५०६ (गुन्हेगारी धमकी) आणि ६६ ई (गोपनीयतेचे उल्लंघन) आणि ६७ अ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आमदार प्रकाश सुर्वे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश सुर्वे यांना ११ नोव्हेंबरला रात्री ९.२० च्या सुमारास एका अनोळखी नंबरवरून एक व्हॉट्सअप मेसेज आला होता, त्याच नंबरवरून त्यांना वारंवार मेसेज येऊ लागले. मात्र अनोळखी नंबरवरून मेसेज येत असल्याने त्यांनी मेसेजला रिप्लाय केला नाही.

- Advertisement -

याचदरम्यान १६ नोव्हेंबरला पुन्हा एकदा त्याच नंबरवरून व्हॉट्सअॅप मेसेज आला. यावेळी लगेच त्याच नंबरवरून प्रकाश सुर्वे यांना व्हिडिओ कॉल आला. सुरुवातीला त्यांनी फोन उचलला नाही. पण दुसऱ्या वेळेस त्यांनी कॉल उचलला. यावेळी एक महिला अश्लील कृत्य करत होती, काय घडतेय हे लक्षात येताच त्यांनी कॉल लगेच कट केला, मात्र त्या व्यकीकडून त्यांना वारंवार फोन येऊ लागले. अनेकदा कॉल उचलून त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल करेन असेही संबंधीत आरोपीला सांगितले.

मात्र काही दिवसांनी आरोपींनी प्रकाश सुर्वे यांचा फोटो दुसऱ्या व्यक्तीसोबत मॉर्फ करुन त्यांना पाठवला आणि ५ हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करु अशी धमकी आरोपीने सुर्वे यांनी दिली. मात्र आपल्याला सेक्सटोर्शन रॅकेटमध्ये अडकवले जात असल्याचे लक्षात येताच प्रकाश सुर्वे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

यापूर्वी कुर्ला – नेहरू नगर येथील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांचे व्हिडीओ मॉर्फ करून खंडणी उकळण्यचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी राजस्थानमधील भरतपूर येथून एकाला मुंबई सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती. मोसमदिन दिन महोम्मद खान असं अटक केलेल्या आरोपीचं नाव होते.


सोमय्यांना माफी मागावी, अन्यथा १०० कोटी द्यावे- अनिल परब


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -