घरपालघररस्त्यातील खड्ड्यांभोवती पांढरी वर्तुळे; सार्वजनिक बांधकाम विभागाने बुजवले खड्डे

रस्त्यातील खड्ड्यांभोवती पांढरी वर्तुळे; सार्वजनिक बांधकाम विभागाने बुजवले खड्डे

Subscribe

रस्त्यावरील खड्डे दृष्टीस पडावे म्हणून पालघरमधील वृक्षमित्र प्रीतम राऊत यांनी रस्त्यातील खड्ड्या सभोवती पांढरे रंगाचे वर्तुळ काढून चालकांना सतर्क केले होते. त्यांच्या या अभिनव कल्पनेला पालघरकरांनी प्रसार माध्यमावर दाद दिली होती.

झोपेचे सोंग घेतलेल्या सार्वजनिक बांधकाम खाते व नगरपरिषद पालघरमधील रस्त्यांवर पडलेले खड्डे वाहनचालकांना दिसत नसल्यामुळे बऱ्याच वेळा अपघात ही होत असतात. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे दृष्टीस पडावे म्हणून पालघरमधील वृक्षमित्र प्रीतम राऊत यांनी रस्त्यातील खड्ड्या सभोवती पांढरे रंगाचे वर्तुळ काढून चालकांना सतर्क केले होते. त्यांच्या या अभिनव कल्पनेला पालघरकरांनी प्रसार माध्यमावर दाद दिली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने लज्जास्पदपणे त्यांच्या या उपक्रमाची दखल घेत दुसऱ्या दिवशीच शहरातील खड्डे बुजवून टाकले. यामुळे पालघर शहरात प्रीतम राऊत यांचा सर्व स्तरावर कौतुक केले जात आहे.

प्रशासन व लोकप्रतिनिधीनी करायची कामे जर सामान्य नागरिकाला करावी लागत असेल, तर अशा प्रशासन व लोकप्रतिनिधीचा काय फायदा? जर लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर वचक नसेल तर सामान्य नागरिकांना सांगा ते आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करतील.
– प्रीतम राऊत, वृषमित्र

- Advertisement -

पालघर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावरून नगरपरिषदेचे अधिकारी तसेच बांधकाम खात्याचे अधिकारी रोज येत-जात असतात. मात्र कुणाचीही नजर या खड्ड्यांवर पडत नसल्यामुळे पालघर येथील वृक्षमित्र प्रीतम राऊत यांनी या खड्ड्यांमुळे कुणाचेही अपघात होऊ नये, म्हणून स्वखर्चाने खड्ड्याभोवती सफेद रंगाचे वर्तुळ काढले होते. ज्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना पुढे खड्डा आहे, हे समजता येईल. खड्ड्यांमध्ये दुचाकी, रिक्षा किंवा चारचाकी आदळल्याने होणाऱ्या त्रासापासून वाहनचालक मुक्त होईल. यासाठी त्यांनी हा अभिनव उपक्रम राबवला होता.
मात्र प्रीतम राऊत यांच्या या अनोख्या उपक्रमांमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली असून दुसऱ्या दिवशीच त्वरित सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारांकडून पालघर शहरातील खड्डे बुजवले असून यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राऊत यांनी जवळपास ३० ते ३५ खड्ड्यांना पांढरे वर्तुळे काढले होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातील त्या ३० ते ३५ खड्डे व्यतिरिक्त शहरातील इतर ठिकाणी असलेले खड्डेही बुजवले आहेत. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता सचिन धात्रक यांची प्रतिक्रिया घेण्याकरता संपर्क केला असता त्यांच्याशी बोलणे होऊ शकले नाही.

हेही वाचा –

भिवंडीतील प्रेरणा कॉम्प्लेक्समधील गोदामाला भीषण आग, १० गोदामं जळून खाक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -