घरक्राइमTET exam scam: टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी सौरभ त्रिपाठीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

TET exam scam: टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी सौरभ त्रिपाठीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Subscribe

अपात्र विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र दाखवण्याचं काम सौरभ त्रिपाठी हा करत असल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. टीईटी भरती घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांनी यापूर्वी जी ए सॉफ्टवेअरच्या अश्विन कुमार याला अटक केलीय. अश्विन कुमार याला कर्नाटकातील बंगळुरू येथून अटक केलीय.

पुणे : टीईटी परीक्षा घोटाळाप्रकरणी पुणे पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. पुणे पोलिसांनी सौरभ त्रिपाठी नावाच्या व्यक्तीला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतलंय. सौरभ त्रिपाठी हा जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा माजी संचालक असून, टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी सौरभची चौकशी सुरू आहे.

अपात्र विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र दाखवण्याचं काम सौरभ त्रिपाठी हा करत असल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. टीईटी भरती घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांनी यापूर्वी जी ए सॉफ्टवेअरच्या अश्विन कुमार याला अटक केलीय. अश्विन कुमार याला कर्नाटकातील बंगळुरू येथून अटक केलीय. 2018 सालच्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या निकालात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांनी सौरभ त्रिपाठी याला ताब्यात घेतलंय. सौरभ त्रिपाठी हा जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा माजी संचालक आहे. त्याने 2018 सालच्या टीईटी परीक्षेच्या निकालात गैरव्यवहार केल्याचा ठपका त्याच्यावर आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय.

- Advertisement -

टीईटी पेपरफुटीप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली होती. अखेर राज्य सरकारने धडक कारवाई करत परीक्षा तुकाराम सुपेला निलंबित करण्यात आलेय. शासनाने महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून तुकाराम सुपेला अटकेच्या तारखेपासून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती.

विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी टीईटी परीक्षेच्या घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर यांना अटक केली. त्यांच्याकडून लाखो रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली असून त्यांनी याप्रकरणी पैसे घेतल्याची कबुलीही दिल्याचेही समजते. याशिवाय त्यांच्या घरात टीईटीचे ओळखपत्रही सापडले आहेत. या सर्व घोटाळ्यात एकटे अधिकारी सहभागी नसून प्रत्येक जिल्ह्यात, गावात त्यांचे दलाल कार्यरत आहेत. या दलालांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण करुन देण्यासाठी उमेदवारांकडून एक ते तीन लाख रुपये घेतल्याची माहिती आहे.

- Advertisement -

सुपे अन् नाशिकचे कनेक्शन

काही वर्षांपूर्वी तुकाराम सुपे हे नाशिक येथे शिक्षण उपसंचालक म्हणून कार्यरत होते. तेव्हा त्यांच्याकडे नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांचे कामकाज होते. त्यामुळे नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगांव जिल्ह्यातील बर्‍याच शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक संघटनांशी त्यांचा नियमित संपर्क होता. तेव्हापासून जिल्ह्यातील काही जण त्यांच्या ‘मर्जीतील’ बनले आहेत. त्यामुळे सुपे हे पुणे येथे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तपदी विराजमान झाल्यानंतर या दलालांचे चांगलेच फावले आहे. यात शिक्षण विभागातील काही बड़े अधिकारी, कर्मचार्‍यांचाही समावेश असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -