घरताज्या घडामोडीMaharashtra Assembly Winter Session 2021 : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, ठाकरे सरकारविरोधात...

Maharashtra Assembly Winter Session 2021 : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी

Subscribe

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. परंतु विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडुन आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामध्ये ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणेबाजी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची वीज कापणी, आरोग्य विभाग आणि म्हाडा परीक्षेत झालेली पेपरफुटी प्रकरण आणि शेतकऱ्यांना इन्टेन्सिव्ह देण्याची घोषणा करून फसवणाऱ्या महाविकास आघाडीचा निषेध करण्यात येत आहे.

- Advertisement -

या आंदोलनामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांसह भाजपच्या सर्व नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आंदोलन करत आहेत.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन सुरू होतं. यामध्ये विरोधी पक्ष नेत्यांकडून तरुणाईचे भविष्य धोक्यात, शेतकऱ्यांची वीज कापणे बंद करा, आरोग्य विभाग आणि म्हाडा भरती परीक्षेत झालेल्या पेपरफुटीची सीबीआय मार्फत चौकशी करा आणि शेतकऱ्यांना इन्टेन्सिव्ह द्या. अशा प्रकारच्या घोषणा विरोधकांकडून करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हेच मुद्दे आता विरोधी पक्षाकडून सभागृहात मांडले जाणार असून त्यावर ठाकरे सरकार काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

विरोधी पक्षाकडून ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष त्यांच्यावर चांगलेच आक्रमक झाल्याचे चित्र पहायला विधानभवनाबाहेर पहायला मिळत आहे. आरोग्य विभाग आणि म्हाडा भरती परीक्षेत झालेल्या पेपरफुटीची सीबीआय मार्फत चौकशी करा आणि इतर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाले असून विधानभवनाच्या पाऱ्यांवर आंदोलन करत आहेत.


हेही वाचा : Maharashtra Assembly winter session 2021: आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्या – चंद्रकांत पाटील


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -