घरक्राइम'सॉरी आंटी' बोलली म्हणून चिडली महिला; तरुणीला केली मारहाण

‘सॉरी आंटी’ बोलली म्हणून चिडली महिला; तरुणीला केली मारहाण

Subscribe

एका महिलेला आंटी म्हटलं म्हणून मोठा वाद झाला. उत्तर प्रदेशमधील एटा भागात तरुणीने महिलेला बाजारात आंटी म्हटले म्हणून वाद झाला आणि तो हाणामारीपर्यंत पोहोचला. महिलेने आंटी म्हटलं म्हणून तरुणीला अक्षरश: मारले.

सणजवळ आल्यामुळे सध्या बाजारात तुफान गर्दी आहे. अशीच गर्दी उत्तर प्रदेशमधील बाबूगंज बाजारपेठेत होती. दुपारी बाजारात एका तरुणीचा महिलेला धक्का लागला. त्यावर तरुणीने महिलेला ‘सॉरी आंटी’ असे म्हणाली. आंटी शब्द ऐकताच महिलेला चिड आली. खरेदी करणे बाजूला ठेवत तरुणीला पकडले आणि जोरदार भांडण करायला लागली. महिलेचा स्वत:वरचा ताबा सुटला आणि तिने तरुणीवर हात उगारला.

- Advertisement -

भर बाजारात महिला आणि तरुणी यांच्यात हाणामारी सुरु झाली. यामुळे बाजारात गोंधळ माजला. हाणामारीमुळे बघ्यांची गर्दी जमली. त्यातील एकाने या दोघांच्या मारामारीचा व्हिडीओ व्हायरल केला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -