घरदेश-विदेशसौरव गांगुलीला भाजपची मुख्यमंत्रीपदाची ऑफर! पण दादा म्हणतो...!

सौरव गांगुलीला भाजपची मुख्यमंत्रीपदाची ऑफर! पण दादा म्हणतो…!

Subscribe

सध्या बिहार विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून आज दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. त्यासोबतच मध्य प्रदेशमधल्या पोट निवडणुकांची देखील चर्चा सुरू असतानाच केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपनं पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून भाजपनं पश्चिम बंगालमध्ये सरकारमध्ये असलेल्या ममता दीदींविरोधात जोरदार मोहीम उघडलेली असतानाच भाजपनं दीदींविरोधात दादाला उमेदवारी देण्याची तयारी सुरू केल्याची जोरदार चर्चा सुरू होती. दादा अर्थात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली याला भाजपनं उमेदवारीसाठी विचारणा केली होती. त्यावर सौरव गांगुलीने भाजपला आपलं उत्तर कळवल्याचं द टेलिग्राफनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

सौरव गांगुली सध्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदी असून कोरोना काळात अध्यक्षपदाला मुदतवाढ देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील वर्षीच्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये सौरव गांगुलीला भाजप तिकीट देणार असल्याचं सांगितलं जात होतं. विशेष म्हणजे गांगुलीला थेट मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवण्याची तयारी देखील भाजपनं चालवली असल्याचं राजकीय वर्तुळात म्हटलं जात होतं. त्यासंदर्भात भाजपनं गांगुलीला विचारणा देखील केली असता गांगुलीनं त्याचं उत्तर भाजपला कळवलं आहे.

- Advertisement -

काय म्हणाला गांगुली?

टेलिग्राफनं म्हटल्याप्रमाणे, ‘BCCI चा अध्यक्ष म्हणून मी करत असलेल्या कामाबाबत मी समाधानी आहे. त्यात मला आनंद आहे. त्यामुळे सध्या तरी मी राजकारणात उतरणार नाही. शिवाय भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचार देखील करणार नाही’, असं गागुलीनं भाजपवला कळवलं आहे.

काय म्हणते बंगालची आकडेवारी?

पश्चिम बंगालमध्ये सध्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसचं सरकार आहे. गेल्या निवडणुकीत म्हणजेच २०१६मध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसनं २९५ पैकी २९१ जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुकीत भाजपला अवघ्या ३ जागांवर विजय मिळवता आला होता. २०१९साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपनं १८ खासदार निवडून आणले. तेव्हापासून राज्यातलं बळ वाढवून विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -