घरदेश-विदेशRajasthan Election: राहुल गांधींच्या ट्वीटवर भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; X खाते बंद...

Rajasthan Election: राहुल गांधींच्या ट्वीटवर भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; X खाते बंद करण्याची मागणी

Subscribe

मतदानाच्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजस्थान सरकारच्या योजनांचा संदर्भ देत X वर एक पोस्ट लिहून मतदान करण्याचे आवाहन केले आहे. या ट्विटवर भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

Rajasthan Assembly Elections 2023, Rahul Gandhi Complaint: राजस्थान निवडणूक 2023 मध्ये विधानसभेच्या 199 जागांसाठी काल, 25 नोव्हेंबरला मतदान झालं आहे. मतदानाच्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजस्थान सरकारच्या योजनांचा संदर्भ देत X वर एक पोस्ट लिहून मतदान करण्याचे आवाहन केले आहे. या ट्विटवर भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. भाजपने आपल्या तक्रारीत राहुल गांधींचे एक्स खाते निलंबित करण्याची मागणी केली आहे. हे ट्विट तत्काळ डिलीट करण्याची मागणीही करण्यात आली आहे. (Rajasthan Election BJP complaint to Election Commission on Rahul Gandhi s tweet Demand for closure of X account )

X वर राहुल गांधी यांनी एक पोस्ट लिहिली आहे आज मोठ्या संख्येने बाहेर पडा, तुमचा मताधिकार वापरा, जनतेच्या हिताचे आणि हमी देणारे काँग्रेसचे सरकार निवडा. भाजपने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, राजस्थान निवडणूक अधिकाऱ्यांनी फौजदारी तक्रार दाखल करावी आणि राहुल गांधींविरुद्ध फौजदारी खटला सुरू करावा.

- Advertisement -

लोकप्रतिनिधी कायद्याचं उल्लंघन

भाजपने निवडणूक आयोगाकडे, राहुल गांधी यांच्यावर लोकप्रतिनिधी कायदा 1951 चे उल्लंघन केल्याप्रकरणी त्वरित कारवाई करण्याची विनंती केली आहे. ही राहुल गांधींच्या सोशल मीडिया पोस्टवर केंद्रित आहे. राजस्थानमधील मतदानाच्या दिवशी असा संदेश पोस्ट करणं कायद्याच्या कलम 126 नुसार गुन्हा ठरतो. या कलमानुसार मतदान संपल्यानंतर 48 तासांच्या आत निवडणूक संबंधित कोणतीही सामग्री प्रदर्शित करण्यास मनाई आहे. राहुल गांधीचीं ही पोस्ट शनिवारी सकाळी 1035 पर्यंत 2 लाख 30 हजार 900 एक्स वापरकर्त्यांनी पाहिल्याची आकडेवारी भाजपने सादर केली आहे.

- Advertisement -

निवडणूक आयोगाला भाजपने विनंती केली आहे की, राहुल गांधींचे एक्स खाते त्वरित निलंबित करण्यास आणि त्यांच्याकडून वेळोवेळी पोस्ट केला गेलेला अपमानजनक मजकूरही त्वरित काढून टाकण्यास एक्स कंपनीला सांगावे, असेही भाजपचे म्हणणे आहे.

पाच राज्यांचा निकाल

छत्तीसगड, मिझोराम, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या पाच राज्यांच्या निवडणुका आहेत. 3 डिसेंबरला या पाचही राज्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये कोणाची सत्ता येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

(हेही वाचा: आता मोदींची जादू चालणार नाही; राऊतांचा घणाघात म्हणाले, यावेळी चित्र बदलेल… )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -