घरमहाराष्ट्रखासगी संविधान लादण्याची तयारी सुरू; राऊतांचा केंद्र सरकारवर आरोप, म्हणाले, 2024 ची...

खासगी संविधान लादण्याची तयारी सुरू; राऊतांचा केंद्र सरकारवर आरोप, म्हणाले, 2024 ची लढाई…

Subscribe

संविधानाचं खासगीकरण सुरू आहे आणि ते कुरतडून खासगी संविधान लादण्याचा प्रयत्न हा केंद्र सरकारकडून सुरू असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबई: संविधानाचं खासगीकरण सुरू आहे आणि ते कुरतडून खासगी संविधान लादण्याचा प्रयत्न हा केंद्र सरकारकडून सुरू असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसंच, काश्मीर आणि मणिपूरमधील परिस्थिती चिंताजनक असल्याचंही म्हटलं आहे. (Preparations to impose a private constitution begin s accusation against the central government Sanjay Raut said the battle of 2024 )

नेमकं काय म्हणाले राऊत?

राऊत म्हणाले की, आज संविधान दिवस आहे. देशाला बाबासाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संविधान दिलं. संविधानामुळे देशाची एकात्मता आणि स्वातंत्र्य टिकून राहत. संविधानामुळे लोकशाही कायम राहिली आहे. मात्र मागच्या 10 वर्षांपासून संविधानात सातत्याने बदल केले जात आहेत. संविधानाच खासगीकरण सुरू आहे. संविधान कमजोर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.. संविधान कुरतडून कुरतडून त्यात आपल्या सायीने हवे तसे बदल करून खासगी संविधान लादण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप राऊतांनी यावेळी केंद्र सरकारवर केला. त्यामुळे 2024 ला होणारी राजकीय लढाई ही केवळ संविधान वाचवण्य़ासाठी होईल, असं राऊतांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

संविधान वाचवणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवं, असंही राऊतांनी यावेळी म्हटलं.

काश्मीर- मणिपूर धुमसतंय

26/11 ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. यावर बोलताना राऊत म्हणाले की, यावेळी अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी हौतात्म्य पत्करून मुंबई वाचवली. आता मुंबई जरी सुरक्षित वाटत असली तरीही काश्मीर आणि मणिपूर मात्र धगधगत आहे. मागच्या 8 दिवसातं काश्मीरमध्ये 6 लष्करी जवानांना हुतात्म आलं आहे. त्यामुळे या दोन राज्यांची जी सध्याची स्थिती आहे ती दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे. यावकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं असल्याचं, राऊतांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

भाजपची मान्यता रद्द केली पाहिजे

प्रभू श्री रामाचे मोफत दर्शन हा आचार संहितेचा भंग आहे. निवडणूक आयोगाने भाजपाला नोटीस बजावत पक्षाची मान्यता रद्द करायला हवी, अशी मागणीही राऊतांनी यावेळी केली.

(हेही वाचा: आता मोदींची जादू चालणार नाही; राऊतांचा घणाघात म्हणाले, यावेळी चित्र बदलेल…)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -