घरमहाराष्ट्रआता मोदींची जादू चालणार नाही; राऊतांचा घणाघात म्हणाले, यावेळी चित्र बदलेल...

आता मोदींची जादू चालणार नाही; राऊतांचा घणाघात म्हणाले, यावेळी चित्र बदलेल…

Subscribe

मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड, मिझोराममध्ये निवडणुका आहेत. त्यांचा निकाल 3 डिसेंबरला लागणार आहे. यावर भाष्य करताना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

मुंबई: मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड, मिझोराममध्ये निवडणुका आहेत. त्यांचा निकाल 3 डिसेंबरला लागणार आहे. यावर भाष्य करताना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ( Maharashtra Politics Now Narendra Modi s magic will not work of Sanjay Raut said this time the picture will change )

राऊत म्हणाले की, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू चालणार नाही. हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ झालं आहे. तसंच, मिझोराममध्ये तिथल्याच प्रादेशिक पक्षांमध्ये लढत आहे. त्यामुळे तिथे भाजपचं अस्तित्वच नाही. तिथे काँग्रेसला तरी थोडी जागा आहे, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

राऊत म्हणाले की, तेलंगणात भाजपा स्पर्धेत नाही. भाजपाने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून के. चंद्रशेखर राव आणि MIM मतदान करण्यासाठी मतदारांना संदेश दिला आहे. पण, काँग्रेसला मतदान करू नये, असंही सांगण्यात आलं आहे. तेलंगणात भाजपाने ही रणनिती आखली आहे. मात्र, तेलंगणात काँग्रेसला मुसंडी मारली असून चांगला निकाल समोर येऊ शकतो. मध्य प्रदेशात भाजपचा दारुण पराभव होईल. तर राजस्थानमध्ये अशोक गहलोत हे जादूगार आहेत. त्यांनी थेट पंतप्रधानांना आव्हान दिलं आहे. तसंच, राजस्थानमध्ये पाच वर्षांनंतर नव्या पक्षाला संधी दिली जाते. असा इतिहास आहे. मात्र यावेळी हे चित्र बदलेल असा विश्वास राऊतांनी यावेळी व्यक्त केला.

रामल्लाच्या नावावर काय मत मागता?

संजय राऊत म्हणाले की, भाजपा विकासाच्या कामावर मते का मागत नाही? प्रभू श्री रामाचे दर्शन मोफत दाखवण्यापेक्षा काश्मीरी पंडितांची घरवापसी केली असती, तर नक्कीच हिंदुत्वाच्या मुद्यावर मते मागण्याचा अधिकार भाजपाला होता. 2014 पासून काश्मीरी पंडिताच्या मुद्यावरून भाजपा मते मागत आहे. पण पुलवामात 40 जवानांची हत्या सरकारच्या निष्काळजीपणामुळे झाली आहे. त्यामुळे भाजपाला मते मागण्याचा अधिकार नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

- Advertisement -

भाजपची मान्यता रद्द केली पाहिजे

प्रभू श्री रामाचे मोफत दर्शन हा आचार संहितेचा भंग आहे. निवडणूक आयोगाने भाजपाला नोटीस बजावत पक्षाची मान्यता रद्द करायला हवी, अशी मागणीही राऊतांनी यावेळी केली.

(हेही वाचा: काँग्रेसचे भूत वारंवार ‘त्यांच्या’ मानगुटीवर बसते…, संजय राऊत यांचा मोदींवर हल्लाबोल )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -