घरताज्या घडामोडीSchool Student: शाळेची फी न भरल्यामुळे १० वर्षीय मुलीचा शिक्षिकेने तोडला हात

School Student: शाळेची फी न भरल्यामुळे १० वर्षीय मुलीचा शिक्षिकेने तोडला हात

Subscribe

सध्या शाळेची फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना मारहाण केल्याच्या किंवा विद्यार्थ्याला कोंडून ठेवल्याच्या घटना सतत समोर येत आहेच. अशाच प्रकारचे कृत्य जयूपरमधील एका शाळेत घडले आहे. आई-वडील वेळेवर शाळेची फी भरत नसल्यामुळे नाराज असलेल्या शिक्षिकेने संबंधित विद्यार्थीनीला मारहाण केली. या मुलीचे नाव शिवानी असून ती अवघ्या १० वर्षांची आहे. ती मुहाना ठाणे क्षेत्रातील कीडों ढाणीमधील ब्लू रिव्हर अॅकेडमी शाळेत शिकते.

शिवानीचे आई-वडील फी भरत नसल्यामुळे शालेय व्यवस्थापनेने हे कृत्य केल्याचे म्हटले जाते. रागात येऊन शाळेतील शिक्षिकेने मुलीला फी भरली नसल्यामुळे मारहाण केली, ज्यामुळे १० वर्षांच्या मुलीचा हात फॅक्चर झाला आहे. माहितीनुसार, पहिल्यांदा शिक्षिकेने तिचा हात तोडला आणि जेव्हा मुलगी वेदनेमुळे ओरडू लागली तेव्हा शिक्षिकेने तिला जमिनीवर पाडून मारहाण केली.

- Advertisement -

मुलीच्या हातामध्ये २ फ्रॅक्चर

मारहाणीनंतर शिवानीची तब्येत बिघडली असून त्यानंतर कुटुंबियांना शाळेत बोलावले गेले. शिवानीने रडत-पडत आई-वडिलांना सर्व घटनेबाबत सांगितले. त्यानंतर आई-वडिलांनी शिवानीला रुग्णालयात घेऊन गेले आणि एक्स-रे काढले. तर रिपोर्टमध्ये दोन फ्रॅक्चर दिसले. ज्यानंतर संतप्त कुटुंबियांनी मुहाना पोलीस ठाण्यात पोहोचून शाळेच्या व्यवस्थापनेविरोधात तक्रार दाखल केली.


हेही वाचा – पुण्यातील शाळेत फीबाबत विचारणेसाठी आलेल्या पालकांना महिला बाऊन्सरकडून मारहाण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -