घरदेश-विदेशछत्तीसगडमध्ये १४ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश

छत्तीसगडमध्ये १४ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश

Subscribe

छत्तीसगडमध्ये पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात राबवलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. कालपासून नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये सुरु असलेल्या चकमकीमध्ये पोलिसांना १४ नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे.

छत्तीसगड पोलिसांची नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. सुकमा जिल्ह्यात १४ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. सुकमा जिल्ह्यातील कोटा- गोलापल्ली जंगलात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कालपासून नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक सुरु होती अखेर सुरक्षा यंत्रणांना नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. कारवाई दरम्यान १६ बंदुक पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

- Advertisement -

दरम्यान पोलीस आणि नक्षलवाद्यामध्ये अजूनही चकमक सुरु आहे. रविवारपासून पोलिसांची नक्षलवाद्यांविरोधात कारवाई सुरु होती. याआधी छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये ३ ऑगस्टला नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत एक नक्षलवाद्याला ठार करण्यात पोलिसांना यश आले होते. या कारवाई दरम्यान दोन पोलीस जखमी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -