घरताज्या घडामोडीबस दरीत कोसळून एकाच गावातील १५ जणांचा मृत्यू

बस दरीत कोसळून एकाच गावातील १५ जणांचा मृत्यू

Subscribe

मर्यादेपेक्षा अधिक प्रवाशी असण्याचा अपघातामागील प्राथमिक अंदाज

डेहराडून – उत्तराखंडमध्ये मोठ्या दुर्घटनेत देहरादूनमधील विकासनगरजवळ बुल्हाड बायला रोडवर एक बस दरीत कोसळली. या दुर्घटनेमध्ये एकाच गावातील १५ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या बसमध्ये २५ जण प्रवास करत होते. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे बस दरीत कोसळून अपघात झाला. ‘पोलीस आणि एसडीआरएफची पथके घटनास्थळावर पोहोचली असून बचावकार्य सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, बसमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी असल्यामुळे हा अपघात झाल्याचे समजतेय.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक बचावकार्य करत आहेत. मृतांच्या आत्म्यांना ईश्वर शांती देवो, असे ट्विट मोदींच्या कार्यालयातून करण्यात आले आहे. पोलिसांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, या अपघातामागे ओव्हरलोडिंग हे एक कारण असू शकते. बसमध्ये मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी होते. बस ज्या मार्गाने जात होती तेथून वाहनांची संख्या कमी असते. त्यामुळे या बसमध्ये मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -