घरताज्या घडामोडीपरमबीर बेल्जियममध्ये पोहोचलेच कसे?

परमबीर बेल्जियममध्ये पोहोचलेच कसे?

Subscribe

संजय निरुपम यांचा ट्विटच्या माध्यमातून सवाल

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप करणार्‍या परमबीर सिंह यांना शोधण्यात अद्याप पोलिसांना यश आलेलं नाही. मात्र परमबीर सिंह बेल्जियममध्ये पोहोचलेत का असा सवाल आता विचारला जातोय. सवाल विचारण्यामागचं कारण म्हणजे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केलेलं ट्वीट. ’परमबीर सिंह बेल्जियममध्ये पोहचलेच कसे? असा प्रश्न निरुपम यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे.

संजय निरुपम यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, “माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मंत्र्यावर हप्ता वसुलीचे आरोप लावले. ते स्वत: पाच प्रकरणात वॉन्टेड आहेत. पोलिसांनी सांगितलं आहे की ते फरार आहेत. आता ते बेल्जियममध्ये असल्याची माहिती समोर येतेय. त्यांना तिथेपर्यंत कोणी पोहोचवलं. त्यांना आपण परत आणू शकत नाही का?”

- Advertisement -

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या विरुद्ध ठाणे न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. पोलिसांनी बुधवारी न्यायालयात अर्ज दाखल केला होता की सिंग यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात यावे.

बिपिन अग्रवाल नावाच्या व्यावसायिकाने मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणात परमबीर सिंग यांच्यासह सचिन वाझे आणि अँटिलिया स्फोटकं प्रकरणी अटक करण्यात आलेला गुंड रियाझ भाटी हेही आरोपी आहेत. अग्रवाल यांच्या मते वाझे आणि इतर आरोपी मिळून मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटमधून पैसे उकळायचे आणि पैसे न दिल्यास त्यांच्यावर कारवाईची भीती दाखवली जात होती. राज्य सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा पगार थांबवला आहे. परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्याचीही राज्य सरकारकडून तयारी सुरु झाली आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -