घरताज्या घडामोडीKabul पुन्हा हादरलं; सीरियल ब्लास्टमध्ये १९ जणांचा मृत्यू, तर ५० जण जखमी

Kabul पुन्हा हादरलं; सीरियल ब्लास्टमध्ये १९ जणांचा मृत्यू, तर ५० जण जखमी

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानमध्ये स्फोट होत आहेत. आजही अफगाणिस्तानची राजधानी काबूल पुन्हा स्फोटामुळे हादरले आहे. लष्करी रुग्णालयाच्या बाहेर स्फोट झाल्याचे समोर आले आहे. या स्फोटानंतर गोळीबार झाल्याचा आवाज ऐकून आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शनीने दिली आहे. काबुलमध्ये झालेल्या आजच्या स्फोटात १९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५० जण जखमी झाले आहेत.

माहितीनुसार, हा स्फोट काबुलमधील लष्करी रुग्णालयाबाहेर झाला आहे. याबाबतची माहिती वृत्तसंस्था एएफपीने दिली आहे. या स्फोटानंतर आणखीन एक स्फोट झाला. म्हणजेच आज काबुलमध्ये दोन स्फोट झाले आहेत. हे स्फोट करण्यामागे कोण आहे? हे अजून समोर आले नाही आहे. तसेच अजूनपर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी घेतली नाही.

- Advertisement -

यापूर्वी काबुलमध्ये सप्टेंबरमध्ये एका मागून एक असे तीन स्फोट झाले होते. काबुल एअरपोर्टवर झालेल्या या स्फोटात १६९ अफगाणिस्तान नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर १३ अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला होता. यानंतर अमेरिकेने एअरस्ट्राईक केला होता. ज्यामध्ये एका लहान मुलासह दोन जणांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेने त्यानंतर दावा केला होता की, यात एका आत्मघाती हल्लेखोराला लक्ष्य करण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये जेव्हा सीरियल ब्लाट झाला होता, तेव्हा यायची जबाबदारी आयएसआयएस-के नावाच्या दहशतवादी संघटनेनी घेतली होती. ऑक्टोबरमध्येही अफगाणिस्तानमधील मशिदीजवळ स्फोट झाले होते.

- Advertisement -

हेही वाचा – अफगाणिस्तानात मशिदीत नमाजदरम्यान भीषण स्फोट, ३२ ठार तर अनेक जण जखमी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -