घरताज्या घडामोडीJNPT : जेएनपीटी रस्त्याच्या कामातील पुलाचा गर्डर कोसळला एक जागीच ठार,...

JNPT : जेएनपीटी रस्त्याच्या कामातील पुलाचा गर्डर कोसळला एक जागीच ठार, तिघे गंभीर जखमी

Subscribe

ब्लॅकलिस्टेड कंपनीला पुलाचे काम देणे पडले महागात

उरणच्या जेएनपीटी बंदराच्या माध्यामातून जेएनपीटी ते अमरमार्ग या रस्त्यावरील शेवटच्या पुलाचे काम सुरू असताना पूल उभारणीचा लोखंडी गर्डर कोसळून झालेल्या अपघातात एका कामगाराचा जागच्या जागी मृत्यू झाला. तर अन्य सहा कामगार गंभीररित्या जखमी झाले असल्याची घटना घडली आहे. जखमींना वाशी येथील एमजीएम इस्पितळात हलवण्यात आले आहे. या अपघातामुळे जेएनपीटी मार्गातील वाहतूक सलग चार तास रोखण्यात आली होती.

हा अपघात नक्की कोणाच्या हलगर्जीपणामुळे झाला ? जेएनपीटीचा कोण अधिकारी या कामाचे देखरेखीचे काम करीत होता, असे अनेक प्रश्न या निमित्ताने विचारले जाऊ लागले आहेत. त्यातच ज्या जे कुमार नामक कंत्राटदाराच्या माध्यमातून हे काम सुरू होते त्या कंत्राटदाराला मुंबई महापालिकेने यापूर्वीच काळ्या यादीत टाकल्याचे बोलले जात असल्याने या कंपनीची कोणती गुणवत्ता बघून या कंपनीला काम दिले आहे आणि आजच्या अपघातानंतर यापूर्वी उभारण्यात आलेल्या पुलांचे काम योग्य आहे ना अशी विचारणा केली जात आहे. जे काम करतांना हा अपघात झाला ते काम स्वतः जे कुमार कंपनी करीत होती की त्यांनी अन्य कुणा उपकंत्राटदाराला हे काम दिले याचीही शहानिशा करण्याची मागणी केली जाते. अपघात घडतेवेळी १३ जण घटनास्थळी काम करत असल्याचे सांगण्यात आले. यातल्या सात जणांना बाहेर काढण्यात यश आले असून त्यातल्या तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. सहाजण जखमी आहेत तर एकाचा जागीच मृत्यू झालाअसून जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

उरणच्या रस्त्यांवर सातत्याने मरण होत असल्याची टीका होत होती त्यातच जे एन पी टीच्या स्थापनेपासून रस्ता रुंदीकरण झाले नव्हते या पार्श्वभूमीवर सध्या २०१४ सालापासून रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येत आहे . यातीलच जेएनपीटी ते आम्रमार्ग या रस्त्याचे संपूर्ण कॉन्क्रीटीकरण आणि विविध ठिकाणी पुलांची उभारणी करण्याचे काम सुरू आहे. काही कामे जेव्ही नामक कंपनीला तर काही कामे जे कुमार नामक कंत्राटदाराला देण्यात आलेले आहे. आज ज्या पुलाच्या गर्डरचे काम सुरू असताना त्यासाठी म्हणून तयार करण्यात आलेली लोखंडी जाळीसह संपूर्ण गर्डरचा सांगाडाच अगदी पत्त्याच्या बंगल्या सारखा पिलरजवळून कोसळला. या कोसळलेल्या गर्डरच्या सांगाड्यावर काम करणारे सर्वच सात कामगार खाली कोसळून त्यांच्या अंगावर या सांगाड्याचा भाग कोसळल्याने त्यात सातजण जखमी झाले त्यातील एकाचा जागच्या जागी मृयू झाला आहे. मृत कामगार हा पच्चीम बंगालचा असल्याचे सांगण्यात आले. या अपघातानंतर बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती तर जासई ते गव्हाण फाटा या मार्गावर सुमारे चार तास वाहतूक कोंडी झाली होती. अपघातातील जखमींना पुढील उपचारांसाठी नवी मुंबईच्या एम जी एम रुग्णालयात हलविण्यात आले.

हे काम ज्या कंत्राटदार जे कुमार यांना देण्यात आले आहे त्या जे कुमार कंपनीला मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी काळ्या यादीत टाकले असल्याची कुजबूज या ठिकाणी ऐकायला मिळाली असून जर हे खरे असेल तर मग अशा कंत्राटदार कंपनीला एवढ्या मोठ्या प्रमाणातील काम देतांना जेएनपीटीच्या अधिकार्‍यांनी त्यांची नक्की कोणती गुणवत्ता पाहिंली, असे विचारले जात आहे.

- Advertisement -

 


हे ही वाचा – एटीएम कार्ड बदलत सोन्याची अंगठी खरेदी; चोरटा जाळ्यात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -