घरदेश-विदेश२००६ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा

२००६ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा

Subscribe

२००६ साली झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी नयीम याला बॉम्बस्फोटासंदर्भात चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याने पळ काढला. तिघांना फास्ट ट्रॅक कोर्टाने जानेवारी २०१७ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली.

मुंबईत २००६ साली मुंबईत ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी लष्कर- ए- तोएबाचा शेख अब्दुल्ला नयीम अलिस समीर याला फास्ट ट्रॅक कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. औरंगाबाद येथे राहणारा शेख अब्दुल्ला २००६ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात तसेच काश्मीरमध्ये भारतीय सैन्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपी होता. एकदा पोलिसांच्या हातावर तुरी देऊ पळून गेला होता. पण अखेर त्याला बंगालच्या बोनगाव येथील फास्ट ट्रॅक कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

कस्टडीतून पळाला

नयीम हा इंजिनीअर असून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो २०१३ साली पळून गेला होता. गेल्या महिन्यात त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आले. त्याच्यासोबत त्याचे सहकारी मोहम्मद युनिस आणि मोहम्मद अब्दुल्ला हे दोघे पाकिस्तानमधील कराचीचे आहेत. तर त्याचा तिसरा सहकारी मोहम्मद मुझ्झफर अहमद हा काश्मीरच्या अनंतनागचा रहिवासी आहे. यांना बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने देश सोडून बांग्लादेशला पळत असताना बॉर्डरजवळ ४ एप्रिल २०१७ साली पकडले.

- Advertisement -
वाचा- कराचीत चिनी दूतावासाजवळ बॉम्बस्फोट

चौकशीवेळी नयीमने काढला पळ

२००६ साली झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी नयीम याला बॉम्बस्फोटासंदर्भात चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याने पळ काढला. तिघांना फास्ट ट्रॅक कोर्टाने जानेवारी २०१७ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली. यावर्षी ऑक्टोबरमध्ये त्याच्या पुन्हा एकदा मुसक्या आवळण्यात आल्या आणि शनिवारी त्यालाही फशीची शिक्षा सुनावण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -