घरदेश-विदेशआयकर भरण्यासाठी पॅनकार्ड बंधनकारक नाही

आयकर भरण्यासाठी पॅनकार्ड बंधनकारक नाही

Subscribe

आता कर आधारकार्डव्दारे भरताना येणार आहे. यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

भारतातील पहिल्या महिला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपलं पहिलं बजेट शुक्रवारी मांडलं आहे. आपल्या बजेटच्या भाषणात अर्थमंत्री यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी आयकर रिटर्न दाखल करण्यासाठी आधार कार्डशी पॅनकार्ड जोडणं बंधनकारक असल्याचा निर्णय दिला होता. याच पार्श्वभूमीच्या दृष्टीकोनातून केंद्र सरकारने एक निर्णय घेतला आहे. कर भरताना आता पॅनकार्डची आवश्यकता नाही. आधार कार्डद्वारे कर भरता येईल, अशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट मांडताना घोषणा केली आहे.

- Advertisement -

१२० कोटी भारतीय नागरिकांकडे आधार कार्ड असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे करदात्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आज मांडलेल्या बजेटमध्ये वार्षिक उत्पन्न २ ते ५ कोटी असणाऱ्यांना ३ टक्के अतिरिक्त कर भरावा लागणार आहे. तसेच वार्षिक उत्पन्न ७ कोटींपेक्षा जास्त असणाऱ्या करदात्यांना ७ टक्के अतिरिक्त सरचार्ज भरावा लागणार आहे. या बजेटमध्ये कररचनेत कोणताही बदल करण्यात आला नाही.

हेही वाचा – Budget 2019-2020 : सोनं आणि पेट्रोल महागणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -