घरताज्या घडामोडीचेन्नईत २३ डिसेंबरपासून लोकल धावणार, केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची घोषणा

चेन्नईत २३ डिसेंबरपासून लोकल धावणार, केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची घोषणा

Subscribe

चेन्नईत लोकल सुरु करण्यास आता ग्रीन सिग्नल मिळाला आहे. येत्या २३ डिसेंबरपासून चेन्नईत लोकल सेवा सुरु केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केली आहे.

चेन्नईत लोकल सुरु करण्यास आता ग्रीन सिग्नल मिळाला आहे. येत्या २३ डिसेंबरपासून चेन्नईत लोकल सेवा सुरु केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. चेन्नईत उपनगरीय लोकल सेवेला उद्यापासून नॉन पिक अवर्समध्ये सामान्य प्रवाशांना प्रवास करण्यास संमती देण्यात आली आहे. तसेच गर्दीच्या वेळा टाळून इतर वेळी सर्व प्रवासी लोकल प्रवास करु शकतात, असं पियूष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता चेन्नईत लोकल सुरु झाली तरी मात्र, मुंबईचे काय? मुंबईत लोकल केव्हा सुरु होणार असा प्रश्न विचारला जात आहे.

- Advertisement -

मुंबईचे काय?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामध्ये लोकल सेवा आणि रेल्वे सेवाही बंद करण्यात आल्या. मात्र, काही दिवसांनी अनलॉक प्रक्रियेत लांबच्या प्रवाशांसाठी लोकल सेवेची मुभा देण्यात आली. त्यानंतर हळूहळू वकिलांना, शिक्षकांनाही संमती दिली गेली. तसेच महिलांना देखील लोकलसेवेची मुभा देण्यात आली. मात्र, सर्वसामान्यांसाठी लोकल अजूनही सुरु झालेली नाही. त्यामुळे चेन्नई लोकल सुरु झाली मात्र, मुंबईचे काय असा सर्वांच पडला आहे.

मुंबईची लोकल म्हणजे सर्वसामान्यांची जीवन वाहिनी. मात्र, ही लोकल सर्वसामान्यांसाठी अद्याप सुरु झालेली नाही. दरम्यान, यासंदर्भात ठाकरे सरकारने केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना आणि रेल्वे मंत्रालयालाही पत्र लिहलं आहे. लोकल सर्वांसाठी सुरु करण्याची मागणीही त्यात करण्यात आली आहे. मात्र, या पत्रानंतरही मुंबईत लोकल कधी सुरु होणार हे स्पष्ट झालेलं नाही.

- Advertisement -

हेही वाचा – अरे व्वा! टाकाऊ प्लॉस्टिकपासून बनवले वर्टिकल गार्डन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -