घरदेश-विदेशचोराच्या गोळीबारात २६ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा अमेरिकेत मृत्यू

चोराच्या गोळीबारात २६ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा अमेरिकेत मृत्यू

Subscribe

चोरीच्या उद्देशाने करण्यात आलेल्या गोळीबारात २६ वर्षीय भारतीय विद्यार्थ्यांचा अमेरिकेत मृत्यू झाला आहे. कानास शहरामध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे.

अमेरिकेतील कानास शहरामध्ये चोरीच्या उद्देशाने केलेल्या गोळीबारात २६ वर्षीय भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. शरथ कोप्पू असे या भारतीय विद्यार्थ्याचे नाव आहे. मुळचा तेलंगणाचा असलेला शरथ कोप्पू वर्षभरापूर्वी शिक्षणासाठी म्हणून अमेरिकेला गेला होता. त्यानंतर त्याने मिसुरी विद्यापीठामध्ये मास्टर्ससाठी प्रवेश देखील घेतला होता. कॉलेजनंतर शरथ कोप्पू कानस शहरातील मासे आणि चिकनच्या दुकानात पार्ट टाईम काम करत होता. शुक्रवारी संध्याकाळी शरथ दुकानामध्ये काम करत असताना चोरीच्या उद्देशाने एक व्यक्ती मासे आणि चिकनच्या दुकानामध्ये शिरली. त्यावेळी करण्यात आलेल्या गोळीबारात शरथ कोप्पूचा मृत्यू झाला. हा सारा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी हल्लेखोराच्या शोधासाठी मोहिम सुरू केली आहे. गोळी झाडल्यानंतर शरथला तात्काळ जवळच्या रूग्णालात हलवण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

नेमकं काय घडलं?

मुळचा तेलंगणाचा असलेला शरथ कोप्पू इंजिनिअर होता. तेलंगणामध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर कोप्पू मास्टर्स करण्यासाठी गेल्या वर्षी अमेरिकेला गेला. मिसुरी विद्यापीठामध्ये शिकत असताना शरथ कानास शहरातल्या मासे आणि चिकनच्या दुकानात काम करत होता. शुक्रवारी देखील शरथ नेहमीप्रमाणे दुकानात काम करत असताना एक जण चोरीच्या उद्देशाने दुकानामध्ये शिरला. त्याने बंदुक काढून दुकानामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर रोखली. यावेळी बचाव करण्यासाठी शरथ कोप्पू पळू लागला. त्यावेळी चोराने शरथच्या दिशेने गोळ्या झाडायला सुरूवात केली. यातील दोन ते तीन गोळ्या शरथच्या पाठीमागे लागून शरथ जागेवरच कोसळला. शरथला तात्काळ रूग्णालयामध्ये हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. दरम्यानच्या काळात चोराने देखील जागेवरून पळ काढला होता. ही सारी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी देखील हल्लेखोरासाठी शोधमोहिम राबवली आहे. शिवाय, माहिती देणाऱ्यास इनामाची देखील घोषणा केली आहे. यासंदर्भात शनिवारी शरथच्या कुटुंबाला कळवण्यात आले असून लवकरच त्याचा मृतदेह भारतात आणण्यात येईल. शिवाय शिगामोमधील भारतीय दुतावासाच्या अधिकाऱ्यांनी देखील सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

यापूर्वी देखील भारतीयांवर हल्ले

अमेरिकेमध्ये भारतीयांवर होणारे हल्ले काही नवीन नाहीत. यापूर्वी देखील भारतीयांना टार्गेट करण्यात आले आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये काळजीचे वातावरण असते. यापूर्वी देखील तिरस्कारच्या भावनेने ३२ वर्षीय श्रीनिवास यांची कानास शहरातील बारमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मुळचे हैद्राबादचे असलेले श्रीनिवास कामानिमित्त अमेरिकेला गेले होते. अशाच प्रकारच्या अनेक घटना यापूर्वी देखील घडलेल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -