घरदेश-विदेशराजधानीत दिल्लीत चिमुरडीवर बलात्कार, स्थानिकांनी चोपलं

राजधानीत दिल्लीत चिमुरडीवर बलात्कार, स्थानिकांनी चोपलं

Subscribe

राजधानी दिल्लीत ३ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली आहे.

रविवारी दिल्लीतील निर्भया प्रकरणाला ६ वर्षे पूर्ण झाली. पण, त्याच दिवशी ३ वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या बलात्कारानं राजधानी दिल्ली पुन्हा एकदा हादरून गेली. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दक्षिण दिल्लीतील द्वारका परिसरामध्ये झालेल्या या घटनेनं दिल्ली हादरून गेली आहे. दरम्यान, चिमुरडीवर सध्या पंडित दिन दयाल उपाध्याय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती मात्र नाजूक आहे. शिवाय, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव देखील होत असल्याची माहिती समोर येत आहे. रणजित असं या ४० वर्षाच्या सुरक्षा रक्षकाचं नाव आहे. रणजित हा त्याच इमारतीमध्ये सुरक्षा रक्षकाचं काम करत होता. चिमुरडीचे पालक घरात नसल्याचं लक्षात आल्यानंतर नराधम रणजितनं त्याचा डाव साधवा. या घटनेनंतर स्थानिकांनी मात्र नराधम रणजितला बेदम चोप दिला. यावरून लोकांमधील रोष दिसून आला पण, त्याचं नक्षीब बलवत्तर म्हणून पोलिस वेळेवरती घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर त्याला स्थानिकांच्या तावडीतून सोडवण्यात आले. दरम्यान, पॉस्को अंतर्गत नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिमुरडीवर उपचार सुरू

दरम्यान, चिमुरडीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दिल्लीतील महिला आयोगाच्या अध्यक्षांनी देखील याबद्दल ट्विट करत माहिती दिली आहे. दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणाला काल अर्थात रविवारी सहा वर्षे पूर्ण झाली. पण, त्याच दिवशी राजधानी दिल्ली चिमुरडीवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणामुळे हादरून गेली आहे. राजधानी दिल्लीमध्ये बलात्काराच्या, छेडछाडीच्या घटना वाढताना दिसत आहेत. त्यामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

वाचा – सहा वर्षे! प्रतिक्षा न्यायाची; अंगावर काटा आणणारी काळरात्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -