घरदेश-विदेशसहा वर्षे! प्रतिक्षा न्यायाची; अंगावर काटा आणणारी काळरात्र

सहा वर्षे! प्रतिक्षा न्यायाची; अंगावर काटा आणणारी काळरात्र

Subscribe

ज्या बसमध्ये निर्भिया प्रतिक्षा करत होती. त्यात ६ नराधम होते. मुकेश सिंग, अक्षय ठाकूर, विनय शर्मा, पवन गुप्ता, राम सिंह आणि अल्पवयीन गुन्हेगाराचा यात समावेश होता.

१६ डिसेंबर २०१२  .. ठिकाण- मुनीरका, दिल्ली… वेळ रात्री- ९वाजता… घरी  जाण्यासाठी एका तरुणीने तिच्या मित्रासोबत खासगी बस पकडली… आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं…या बसमध्ये तिच्यासोबत असे काही होईल याचा तिने विचारदेखील केला नव्हता. बसमधील ६ जणांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. बलात्कार करुन भागले नाही तर तिच्या गुप्तांगामध्ये असंख्य वार केले. सोबत असलेल्या तरुणाला मारले आणि दोघांना बसमध्ये नग्नावस्थेत बाहेर फेकून दिले. त्यानंतर झालेल्या संपूर्ण घटना संपूर्ण देशाला माहीत आहे. या घटनेनंतर संतापाची एक लाट देशभर उसळली… आज १६ डिसेंबर २०१८ या घटनेला ६ वर्षे पूर्ण झाली. पण अद्यापही निर्भया म्हणेजच ज्योतीला न्याय मिळाला नाही. ४ आरोपींना त्यांच्या या कृत्यासाठी फासावर चढवण्यात आले नाही. आजही घटना आठवली की, देशवासियांच्या अंगावर काटा आल्यावाचून राहत नाही.

वाचा- निर्भयाच्या बलात्काऱ्यांना ‘फाशी’च

फाशीची प्रतिक्षा

ज्या बसमध्ये निर्भिया प्रतिक्षा करत होती. त्यात ६ नराधम होते. मुकेश सिंग, अक्षय ठाकूर, विनय शर्मा, पवन गुप्ता, राम सिंह आणि अल्पवयीन गुन्हेगाराचा यात समावेश होता. यातील मुख्य आरोपी राम सिंह या आरोपीने ११ मार्च २०१३ रोजी तिहार जेलमध्ये आत्महत्या केली. त्यामुळे आता यातील ४ आरोपींना फाशीची शिक्षा मिळण्याची संपूर्ण देशाला आणि निर्भयाच्या आईला शिक्षा मिळण्याची प्रतिक्षा आहे. ६ वर्षे या घटनेला झाली आहेत आता तरी न्याय मिळावा, अशी अपेक्षा निर्भयाच्या आईने अनेकदा प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखवली आहे.

वाचा- निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी की जन्मठेप? पुनर्विचार याचिकेवर आज सुनावणी
death penalty for nibhaya case
निर्भया प्रकरण: आरोपी  अक्षय ठाकूर, मुकेश सिंग, विनय शर्मा, पवन गुप्ता
- Advertisement -

घटनाक्रम

१६ डिसेंबर २०१२– दिल्लीतील मुनीरका भागातील वसंतविहारमध्ये एका चालत्या बसमध्ये एका तरुणीवर ६ जणांनी बलात्कार केला. सोबत असलेल्या तिच्या मित्रालाही मारहाण करण्यात आली.

- Advertisement -

१७ डिसेंबर२०१२– पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करत यातील मुख्य आरोपी राम सिंह याला अटक केली.

१८ डिसेंबर २०१३- संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. आरोपींना फासावर चढवण्यासाठी प्रदर्शने करण्यात आली.

१९ डिसेंबर २०१२ या घटनेतील अन्य आरोपी विनय, पवन आणि मुकेशच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. कोर्टात आरोपी पवन आणि विनय या दोघांनी आपला गुन्हा कबूल केला. विनयने कोर्टाकडे फाशीच्या शिक्षेची मागणी केली. दिल्ली उच्च न्यायालयाने या संदर्भात दिल्ली पोलिसांकडून रिपोर्ट मागवला.

२१ डिसेंबर २०१२– या प्रकरणातील पाचवा आरोपीने तो अल्पवयीन असल्याचे सांगितले. गुन्हा घडला त्यावेळी तो साडे सतरा वर्षांचा होता. त्याला आनंद विहार बस स्टँडवरुन अटक करण्यात आली. तर त्याच दिवशी अक्षय कुमार ठाकूरला बिहारमधून पकडण्यात आले.

२२डिसेंबर २०१२-निर्भयाने रुग्णालयातून साक्ष नोंदवली.

२३ डिसेंबर २०१२– दिल्ली कोर्टाने स्पेशल फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना केली.

२४ डिसेंबर २०१२– संपूर्ण देशभर निदर्शने सुरु असताना शासनाने आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळण्यासाठी आणि एक नवा कायदा तयार करण्यासाठी समितीची स्थापना केली.

२६ डिसेंबर २०१२- निर्भयाची तब्येत खालावली. तिला एअर अॅम्ब्युलन्सने सिंगापूरच्या माऊंट एलिजाबेथ रुग्णालयात पाठवण्यात आले.

२९ डिसेंबर २०१२– उशीरा रात्री २ वाजून १५ मिनिटांनी निर्भयाने सिंगापूरमध्ये अखेरचा श्वास घेतला.

२८ जानेवारी २०१३- सहा आरोपीमधील एका आरोपीला अल्पवयीन घोषित करण्यात आले.

३ जानेवारी २०१३– पोलिसांनी ५ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले.

२ फेब्रुवारी २०१३- फास्ट ट्रॅक कोर्टाने पाच जणांवर हत्या, सामूहिक बलात्काराचे आरोप निश्चित केले.

११ मार्च २०१३- मुख्य आरोपी राम सिंहने तिहार जेलमध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केली.

११ जुलै २०१३- या घटनेतील अल्पवयीन आरोपीला चोरीसाठी दोषी ठरविण्यात आले.

३१ ऑगस्ट २०१३– अल्पवयीन गुन्हेगाराला तीन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली.

१३ सप्टेंबर २०१३- ट्रायल कोर्टाने आरोपी पवन, अक्षय, मुकेश आणि विनयला फाशीची शिक्षा सुनावली.

१३ मार्च २०१४- दिल्ली उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली.

१५ मार्च २०१४- आरोपी पवन आणि मुकेशने फाशीच्या शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केले.

जुलै २०१४– अन्य आरोपींनी देखील सर्वोच्च न्यायालयात अपील केले.

४ एप्रिल २०१६- सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात

२८ एप्रिल २०१६- सर्वोच्च न्यायालयाने तीन सदस्यीय खंडपीठाची स्थापना केली

जानेवारी २०१७ – सुनावणीला नियमित सुरुवात

 २७ मार्च २०१७- सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला

५ मे २०१७- फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब, तीन आरोपींनी पुनर्विचार याचिका दाखल केली

 ५ मे २०१८– सर्वोच्च न्यायालयाने निर्णय ठेवला राखून

९ जुलै२०१८- आरोपींची पुनर्विचार याचिका केली रद्द

आता प्रतिक्षा फाशीच्या दिवसाची

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -