घरदेश-विदेश7th Central Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता 'ही' रक्कम मिळणार दुप्पट,...

7th Central Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता ‘ही’ रक्कम मिळणार दुप्पट, सरकारने वाढवली मर्यादा

Subscribe

7th Central Pay Commission Pay Matrix: कोरोना महामारीच्या काळात सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय भत्त्याची(Medical Claim Reimbursement) मर्यादा (Ceiling) वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या आदेशानुसार नवोदय विद्यालय समितीच्या (Navodaya vidyalaya samiti) कर्मचाऱ्यांना आता ५ पट अधिक वैद्यकीय भत्ता (मेडिकल क्लेम) मिळणार आहे. त्यामुळे ५००० रुपयांऐवजी वर्षाकाठी २५००० रुपये मिळणार आहेत.

या आदेशानुसार, प्राचार्यां (Principal) व्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांनी शासकीय किंवा CGHS नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेतल्यास त्यांच्या उपचारांची रोख मर्यादा ५००० रुपयांवरून २५००० रुपयांपर्यंत वाढविण्यात आली. हा आदेश १४ मेपासून अंमलात आणण्यात आला आहे. या व्यतिरिक्त एखाद्या विद्यालय (Vidyalaya) स्तरावरील कर्मचारी जर एएमएकडून उपचार करु घेत असल्यास त्याला उपचारांसाठी मिळणारी रोख मर्यादा ५००० रुपयांवरून १५००० रुपयांपर्यंत करण्यात आली आहे.

- Advertisement -

यावर शिक्षण विभागाचे सांगणे आहे की, खासगी डॉक्टर कामावर घेण्याचा प्रस्ताव भारत सरकारच्या निर्णयानुसार आहे. यापूर्वी, प्रादेशिक कार्यालय सर्व प्राचार्यांना सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना पाठवेल आणि त्यांनाही या नियमांचे पालन करावे लागेल. हा भत्ता CGHS (Central Government Health Srvices) क्षेत्राच्या बाहेर असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. १९ डिसेंबर १९९७ नंतर FMA मध्ये बरेच बदल झाले आहेत. तसेच वेळोवेळी सुधारणा देखील केल्या जात आहेत.

यापूर्वी केंद्र सरकारने पेन्शनधारकांना १००० रुपये वैद्यकीय भत्ता (Fixed Medical Allowance) देण्यास मान्यता दिली होती. यात अशा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे ज्यांनी सेवानिवृत्तीनंतर किंवा त्याआधी या भत्तेची मागणी केली नव्हती. त्यामुळे असेच कर्मचारी या वैद्यकीय भत्त्यासाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्याच्या तारखेपासून त्यांना हा भत्ता मिळणे सुरू होणार आहे.

- Advertisement -

Covid-19 : ‘या’ पद्धतीने तुम्ही N-95मास्क आणि पीपीई किट पुन्हा वापरु शकता

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -