घरदेश-विदेश'मिशन शक्ती' भाषण: निवडणूक आयोगाची मोदींना क्लीन चिट

‘मिशन शक्ती’ भाषण: निवडणूक आयोगाची मोदींना क्लीन चिट

Subscribe

२७ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना भारताने मिशन शक्तीच्या माध्यमातून अंतराळात नवा विक्रम रचला आहे. असे म्हटले असताना विरोधकांनी टीका केली होती.

‘मिशन शक्ती’च्या यशाबद्दल संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ मार्च रोजी देशाला माहिती दिली. मात्र विरोधकांनी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. विरोधकांनी केलेल्या या तक्रारीवर निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिले होते. परंतु, या प्रकरणात निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, मोदींनी केलेल्या ‘मिशन शक्ती’ यशाच्या भाषण संबोधनातून आचारसंहितेचे उल्लंघन झाले नाही.

समितीद्वारे मोदींच्या भाषणाची तपासणी

भारताच्या ‘मिशन शक्ती’ च्या यशाची माहिती सर्वत्र देण्यासाठी मोदी यांनी २७ मार्च रोजी जनतेशी संवाद साधला होता. या भाषणात मोदींनी आचार संहितेचे उल्लंघन केले की नाही, या संदर्भात आयोगाकडून चौकशी करण्यात आली. यावेळी आयोगाने एका समितीची नियुक्ती देखील करण्यात आली होती. तसेच दुरदर्शन आणि आकाशवाणीकडून संबंधित भाषणाची माहिती मागवण्यात आली होती. विरोधकांनी केलेल्या तक्रारीनंतर बुधवारी उप निवडणूक आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची स्थापना करण्यात आली. या स्थापन केलेल्या समितीद्वारे मोदींच्या भाषणाची तपासणी केली गेली.

- Advertisement -

मोदींना क्लीन चिट

विरोधकांनी मते ‘मिशन शक्ती’च्या संबोधनातून मोदी भाषणात राष्ट्राच्या सुरक्षे संदर्भात काही बोलेले नाही तसेच सरकारच्या कामाचा उल्लेख त्यांनी केला असून मोदींनी आचारसंहितेचे उल्लंघन केले. मात्र मोदींच्या संबोधनात सरकार बद्दल कोणतीच माहिती त्यांनी भाषणा दरम्यान सांगितली नसल्याने ‘मिशन शक्ती’च्या संबोधनातून आचारसंहितेचे उल्लंघन झाले नाही. तसेच ‘मिशन शक्ती’ भाषण प्रकरणात मोदींना क्लीन चिट देऊन निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -