घर देश-विदेश Aditya-L1 : सेल्फी क्लिक करून आदित्य-एल1 ने कार्यरत असल्याचे दाखविले; पृथ्वी...

Aditya-L1 : सेल्फी क्लिक करून आदित्य-एल1 ने कार्यरत असल्याचे दाखविले; पृथ्वी अन् चंद्राचे पाठवले फोटो

Subscribe

Aditya-L1 : चांद्रयान-3 नंतर इस्रोची सूर्य मोहीम आदित्य-एल 1 (Aditya-L1) मार्गी लागली आहे. प्रकृती ठीक आहे सांगण्यासाठी आदित्य-एल 1 ने सेल्फी क्लिक केला असून पृथ्वी आणि चंद्राचे फोटो पाठवले आहेत. याशिवाय आदित्य-एल 1 ने व्हिडीओ देखील बनवला आहे. इस्रोने याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. याशिवाय आदित्य-एल 1 चे सर्व कॅमेरे व्यवस्थित काम असल्याचेही सांगितले आहे. (Aditya-L1 Selfie click shows Aditya-L 1 working Sent photos of earth and moon)

चांद्रयान-3 च्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) आपली पहिली सूर्य मोहीम ‘आदित्य-एल 1’ चे 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वा. 50 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. भारताच्या या पहिल्या सौर मोहिमेद्वारे इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे. आदित्य-एल1 18 सप्टेंबरपर्यंत पृथ्वीभोवती चार वेळा आपले कक्ष बदलणार आहे. 10 सप्टेंबरच्या रात्री कक्षा बदलेल त्यानंतर आदित्य-एल 1 पहिल्या कक्षेत प्रवेश करेल. यानंतर आदित्य-एल 1 दररोज 1440 फोटो पाठवणार आहे. जेणेकरून इस्रोला सूर्याचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास करता येईल. आदित्य-एल 1 मध्ये स्थापित दृश्यमान उत्सर्जन लाइन कोरोनाग्राफ (VELC) द्वारे काढण्यात येणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – India vs Bharat : नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर…, रोहित पवारांचे भाजपावर टीकास्त्र

इस्रो शास्त्रज्ञांच्या मते, फेब्रुवारीमध्ये आदित्य-एल1 पहिले चित्र काढेल. स्थापित दृश्यमान उत्सर्जन लाइन कोरोनाग्राफ (VELC) ची निर्मिती भारतीय खगोल भौतिकी संस्थेने केली आहे. इस्रोच्या सूर्य मोहिमेत सहभागी असलेली VELC सूर्याचे एचडी फोटो घेईल. पृथ्वीभोवतीची कक्षा बदलली जात आहे जेणेकरून आदित्य-एल 1 चा एवढा वेग वाढेल की, ते 15 लाख किमीचा प्रवास पूर्ण करू शकेल. एल 1 पर्यंतचा प्रवास पूर्ण केल्यानंतर आदित्यचे सर्व पेलोड्स चालू होतील. म्हणजे त्यात बसवण्यात आलेली सर्व उपकरणे सक्रिय होतील आणि तो सूर्याचा अभ्यास सुरू करेल. परंतु ते वेळोवेळी व्यवस्थित काम करते का, हे तपासण्यासाठी पेलोड्स सक्रिय केले जाऊ शकतात.

- Advertisement -

5 वर्षांच्या कालावधीत सूर्याशी संंबंधित डेटा पाठवणार

इस्रोच्या शास्त्रज्ञांनी पाच वर्षांसाठी आदित्य-एल 1 मिशन सूर्यावर पाठवले आहे. परंतु जर ते सुरक्षित काम करत असेल तर ते 10-15 वर्षे आणखी काम करू शकते, अशी शास्रज्ञांना अपेक्षा आहे. सूर्याशी संबंधित डेटा पाठवणार आहे, पण यासाठी आधी L1 बिंदू गाठणे आवश्यक आहे. लॅरेंज पॉइंट हे अंतराळातील असे ठिकाण आहे जे पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये सरळ रेषेत आहे. पृथ्वीपासून त्याचे अंतर 1.5 दशलक्ष किलोमीटर आहे. सूर्य आणि पृथ्वीचे स्वतःचे गुरुत्वाकर्षण आहे. या दोघांचे गुरुत्वाकर्षण केवळ L1 बिंदूवर एकमेकांशी आदळते किंवा असेही म्हणता येईल की, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव याठिकाणी संपतो आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव तिथून सुरू होतो. मधल्या बिंदूला Lagrange Point म्हणतात.

हेही वाचा – भाजप नेते अमित मालवीयांविरोधात FIR दाखल; उदयनिधी स्टॅलिन संदर्भात केलेलं वक्तव्य भोवलं

सूर्यापासून पृथ्वीचे अंतर 150 दशलक्ष किमी

पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये असे पाच लॅरेंज बिंदू ओळखले गेले आहेत. भारताचे सूर्ययान लारेंज पॉइंट वन म्हणजेच L1 येथे तैनात केले जाईल. त्यामुळे अवकाशयानाचे इंधन कमी वापरले जाईल आणि ते बराच वेळ काम करेल. L1 सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये एका सरळ रेषेत स्थित आहे. हे सूर्य आणि पृथ्वीमधील एकूण अंतराच्या एक टक्का आहे. म्हणजे 15 लाख किमी आणि सूर्यापासून पृथ्वीचे अंतर 150 दशलक्ष किमी आहे.

आदित्य-L1 काय अभ्यास करणार? 

  1. सौर वादळे, सौर लहरी येण्याची कारणे आणि त्यांचा पृथ्वीच्या वातावरणावर काय परिणाम होतो.
  2. सूर्यामधून बाहेर पडणाऱ्या उष्णता आणि उष्ण वाऱ्यांचा आदित्य अभ्यास करणार आहे.
  3. सौर वाऱ्यांचे वितरण आणि तापमानाचा अभ्यास करेल.
  4. सौर वातावरण समजून घेण्याचा प्रयत्न करेल.

- Advertisment -