घरलाईफस्टाईलबाप्पाच्या स्वागतासाठी असे सजवा घर

बाप्पाच्या स्वागतासाठी असे सजवा घर

Subscribe

लवकरच घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे.त्यासाठी आतापासूनच घरांत तयारी सुरु झाली आहे. घर स्वच्छ करण्यापासून ते डेकोरेशनचे काम फार महत्त्वाचे असते. अशातच बाप्पाच्या स्वागतासाठी तयारी जोरदार केली जाते. जेणेकरुन बाप्पा घरी येईल तेव्हा घर प्रसन्न वाटेल. त्यामुळे यंदा बाप्पाच्या स्वागतासाठी घर कसे सजवाल याच बद्दलच्या पुढील काही खास आयडियाज तुमच्या कामी येऊ शकतात. (Ganpati decoration ideas)

फुलांची करा सजावट

- Advertisement -


बाप्पाच्या स्वागतासाठी तुम्ही तुमच्या घराला फुलांची सजावट करू शकता. यादरम्यान फुलांची आरास सुंदर दिसते. यासाठी ताज्या फुलांचा वापर करु शकता. या व्यतिरिक्त मार्केटमध्ये आर्टिफिशिअळ फुलं सुद्धा मिळतात. त्याने ही घराचे डेकोरेशन करू शकता.

पेपर क्राफ्टने घराची सजावट

- Advertisement -


यंदाच्या गणपतीसाठी आपल्या घरी सुंदर असे पेपर क्राफ्ट तयार करा. याचा विविध आयडियाज सोशल मीडियात मिळतील. त्या संबंधित व्हिडिओ ही मिळतील. या व्यतिरिक्त रंगीत कागदांचा वापर करुन सुंदर असे क्राफ्ट तयार करू शकता.

लाइटिंगने सजवा घर


गणपतीवेळी घर अगदी लख्ख प्रकाशाने झगमगावे असे वाटत असेल तर रंगीत लाइटिंगने घर सजवू शकता. बाप्पाच्या डेकोरेशनला ही लाइटिंग करू शकता. अथवा फुलं आणि सोनेरी रंगाच्या लाइटचे कॉम्बिनेशन ही सुंदर दिसेल. त्याचसोबत लाइटचे विविध ऑप्शन ही ट्राय करू शकता.

रांगोळीने सजवा घर


गणपतीच्या स्वागतासाठी तुम्ही तुमच्या घरी सुंदर अशी रांगोळी काढू शकता. यासाठी रंगाची रांगोळी अथवा फुलांची रांगोळी काढू शकता. गणपतीच्या आसनाजवळ जरुर फुलांची रांगोळी काढू शकता. तसेच मुख्य प्रवेशद्वाराजवळ ही रांगोळी काढा.


हेही वाचा- आर्थिक संकटातून बाहेर काढेल जास्वंदीचे फुल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -