घरदेश-विदेशअफगाणिस्तानच्या माजी मंत्र्यावर आली जर्मनीत पिझ्झा विकण्याची वेळ

अफगाणिस्तानच्या माजी मंत्र्यावर आली जर्मनीत पिझ्झा विकण्याची वेळ

Subscribe

अफगाणिस्तानात दोन दशकांनंतर पुन्हा तालिबानची राजवट आली आहे. अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानमधून माघारी परतल्यानंतर तालिबानचा क्रुर चेहरा जगासमोर येत आहे. शेकडो अफगाणी नागरिक जीव मुठीत घेऊन जगतायतं. तर सर्वाधिक अफगाणी नागरिकांनी आणि सत्तेवरील राज्यकर्त्यांनी देश सोडून पळ काढला. मात्र अफगाणिस्तावर एकेकाळी राज्य करणाऱ्या नेत्यांना बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतोय. अशातच अफगाणिस्तानचे माजी दूरसंचार मंत्री यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्या फोटोवर विश्वास ठेवणेही कठीण आहे. माजी मंत्री सय्यद अहमद शाह सद्दत यांनी जर्मनीच्या लिपजिग शहरात आश्रय घेतला. या शहरात येताच कुटुंबाचा आर्थिक प्रपंच सुरु ठेवण्यासाठी त्यांच्यावर चक्क पिझ्झा डिलिव्हरी करण्याची वेळ आली आहे. गेली दोन महिने ते या शहरात पिझ्झा डिलिव्हरी करत आहेत.

अफगाणिस्तानमध्ये लोकशाहीचे राज्य असताना सय्यद अहमद शाह सद्दत एक महत्वाचे राज्यकर्ते होते. मात्र अफगाणीवर तालिबान्यांचे वर्चस्व वाढत असल्याने त्यांनी या देशातून पळ काढत जर्मनीमध्ये आश्रय घेतला. मात्र एकेकाळी चार सुरक्षा रक्षकांच्या बंदोबस्तात शूट-बूट घालून अगदी श्रीमंतीचे जीवन जगणाऱ्या सय्यद अहमद शाह सद्दत यांच्यावर आता पिझ्झा डिलिव्हरी करण्याची वेळ आली आहे.

- Advertisement -

डिसेंबर २०२० मध्ये सय्यद अहमद शाह सद्दत अफगाणिस्तान सोडून जर्मनीत स्थलांतरित झाले. त्यांनी चांगल्या प्रकारे शिक्षण घेतले आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी कम्युनिकेशन विषयात MScs पदवी घेतली. तसेच पुढे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केले. सय्यद अहमद शाह यांनी जगभरातील १३ मोठ्या शहरांमध्ये २३ वर्षे वेगवेगळ्या प्रकारची कामं केली. परंतु देश सोडल्यानंतर त्यांच्या नशीबानेही त्यांची साथ सोडली. परंतु इतके शिक्षण घेऊनही त्यांच्यावर घरोघरी जाऊन पिझ्झा विकण्याची वेळ आली.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना सय्यद अहमद शाह सद्दत यांनी सांगितले की, सुरुवातीच्या दिवसांमध्ये मला या शहरात राहताना अनेक अडचणी आल्या, कारण जर्मन भाषा येत नसल्याने काम मिळत नव्हते. म्हणून जर्मन भाषा शिकण्यासाठी त्यांनी डिलिव्हरी बॉयचे काम करण्याचे ठरवले. या नोकरीच्या माध्यमातून शहरातील विविध शहरांत फिरुन लोकांशई बोलून ही भाषा शिकण्याचा प्रयत्न करतोय. जेणेकरुन आगामी दिवसात मला आणखी चांगली नोकरी मिळेल.

- Advertisement -

अफगाणिस्तानावर तालिबानने ताबा मिळवताच माजी अध्यक्षांसह अनेक मोठ्या नेत्यांनी अफगाणिस्तान सोडत वेगवेगळ्या देशांमध्ये आश्रय घेतली. परंतु एखाद्या देशातील मोठा मंत्री पहिल्यांदाच पिझ्झा विक्री करताना दिसला. यासंबंधीचे छायाचित्र बाहेर येताच आता त्याची चर्चा सुरु झाली आहे.


आयकर विभागाच्या कारवाईशी माझा संबंध नाही, सोमय्यांच्या दाव्याला भुजबळांचे उत्तर


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -