घरताज्या घडामोडीअभिनेता प्रकाश राज पुन्हा बोहल्यावर, लिपलॉक किसचा फोटो व्हायरल

अभिनेता प्रकाश राज पुन्हा बोहल्यावर, लिपलॉक किसचा फोटो व्हायरल

Subscribe

तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी या चित्रपटात काम करणारे लोकप्रिय अभिनेते प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा लग्न केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. काल, गुरुवारी प्रकाश राज यांच्या लग्नाचा ११वा वाढदिवस होता. यानिमित्ताने प्रकाश राज यांनी आपल्या मुलगा वेदांतसाठी पुन्हा एकदा लग्न केलं आहे. पण त्यांनी आपली पत्नी पोनी वर्मासोबतच पुन्हा लग्न केले असून त्यांचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prakash Raj (@joinprakashraj)

प्रकाश राज यांचा मुलगा वेदांतला आपल्या आई-वडिलांचे लग्न पाहायचे होते. त्यामुळे ११व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने प्रकाश राज पुन्हा लग्नबंधनात अडकले. प्रकाश राज यांनी या छोट्याशा सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये प्रकाश राज गुडघ्यावर बसून पत्नीला आपल्या मुलासमोर अंगठी घालताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ते लिप किस करताना दिसत आहेत. यानिमित्ताने प्रकाश राज आपल्या पत्नी आणि मुलांसोबत खूप आनंदी असल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

हे फोटो शेअर करत प्रकाश राज यांनी लिहिले आहे की, ‘आजच्या रात्री आम्ही दोघांनी पुन्हा लग्न केलं. कारण आमच्या मुलाला आमचं लग्न पाहायचं होत.’ वेदांतसोबत या छोट्या सोहळ्यात प्रकाश राज यांची मुलगी मेघना आणि पूजा देखील होती.

- Advertisement -

प्रकाश राज यांच्या या दोन मुली पहिली पत्नी लालिथा कुमारी यांच्यापासून झाल्या आहेत. २००९मध्ये प्रकाश आणि ललिता विभक्त झाले होते. दरम्यान काल प्रकाश राज यांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रिशनपूर्वी पत्नीला सोशल मीडियावरून शुभेच्या दिल्या होत्या. त्यांनी लग्नाचा फोटो शेअर करत लिहिले होते की, ‘हा अत्यंत योग्य निर्णय असल्याचे सिद्ध झाले आहे. दोन अनोळखी लोकांसाठी. एक चांगली मैत्रिण आणि प्रेमिका होण्यासाठी आणि आमच्या आयुष्यातील एक चांगला प्रवासी होण्यासाठी धन्यवाद.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Prakash Raj (@joinprakashraj)

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर प्रकाश राज Edhiri शॉर्ट फिल्ममध्ये पाहिले होते. त्यानंतर आता ते मणिरत्नमचा चित्रपट पोन्नियन सेल्वनमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटात ऐश्वर्या राय प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.


हेही वाचा – Bigg Boss OTT: करण जोहरवर स्पर्धकांनी लावला पक्षपाताचा आरोप 


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -