घरताज्या घडामोडीभाजपच्या कार्यकर्त्याने मशिदीत वाचली हनुमान चालिसा; मौलानावर कारवाई

भाजपच्या कार्यकर्त्याने मशिदीत वाचली हनुमान चालिसा; मौलानावर कारवाई

Subscribe

सामाजिक सद्भावना वाढावी यासाठी मशिदीत हनुमान चालिसा वाचली

मथुरेच्या मंदिरात नमाज पठण केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वादाची ठिणगी पडली. या बाबत चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा वाद संपत नाही तर आता उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये एका मशिदीत हनुमान चालिसा वाचनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका भाजप कार्यकर्त्याने मशिदीत हनुमान चालिसा वाचतानाचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवीन वाद सुरू झाला आहे.

मनुपाल बन्सल असं त्या भाजप कार्यकर्त्याचं नाव आहे. त्याने विनयपूरच्या एका मशिदीत हनुमान चालिसाचं वाचन केलं. मशिदीचे मौलाना अली हसन यांची परवानगी घेऊनच मशिदीत हनुमान चालिसाचं वाचन केलं असं मनुपाल बन्सल यांनी सांगितलं. सामाजिक सद्भावना वाढावी यासाठी मशिदीत हनुमान चालिसा वाचली, असंही ते म्हणाले. म्हणून त्यांनी मशिदीत जाऊन फेसबुक लाइव्ह करून हनुमान चालिसा वाचली.

- Advertisement -

या घटनेनंतर मुस्लिम समाजातून संतप्त प्रतिक्रीया समोर आल्या. या घटनेबाबत मौलाना अली हसन यांना मशिदीतून बरखास्त करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे मौलाना यांना गाझियाबादच्या लोनीला निघून जा, असंही सांगण्यात आलं आहे. मात्र मनुपाल बन्सल यांनी या कारवाईचा निषेध व्यक्त केला आहे.

मथुरेत २९ ऑक्टोबरला नंद बाबा मंदिरात फैसल खान यांनी नमाज पठण केलं होतं. ‘आम्ही कोणालाही फसवून नमाज पठण केलं नाही. पुजाऱ्याच्या परवानगी घेऊनच आम्ही मंदिरात नमाज पठण केलं. यात आम्ही कोणतीही चूक केली नाही’ असं स्पष्टीकरण फैजल खान यांनी दिलं होतं. त्यानंतर चार जणांना अटक करण्यात आली. आता बागपत येथे मशिदीमध्ये हनुमान चालिसाचे वाचन वाचल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – प्रदूषणाने दिल्लीचं झालं गॅस चेंबर; दिवाळीत फटाके न फोडण्याचं आवाहन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -