घरदेश-विदेशATM रिकॅलिब्रेटसाठी हवेत १०० कोटी!!

ATM रिकॅलिब्रेटसाठी हवेत १०० कोटी!!

Subscribe

१००च्या नवीन नोटा चलनात येणार असल्याने आता ATMच्या रिकॅलिब्रेटसाठी १०० कोटींचा खर्च येणार आहे. यापूर्वी देखील नोटाबंदीनंतर देशातील २.४ लाख एटीएम रिकॅलिब्रेट करण्यात आली होती.

१०० रूपयाची नवी नोट चलनात येणार असल्याने ATM रिकॅलिब्रेट करण्यासाठी आता तब्बल १०० कोटींची गरज आहे. १००च्या नव्या नोटा चलनात येणार आहे. त्यासाठी देशातील २.४ लाख ATM रिकॅलिब्रेट करावे लागणार असून १०० कोटींची गरज लागणार आहे. नोटाबंदी नंतर देखील देशभरातील सर्व एटीएम रिकॅलिब्रेट करण्यात आले होते. नोटाबंदी करण्यात आल्यानंतर २००० हजार आणि २००च्या नवीन नोटा चलनात आल्या होत्या. या नोटा ATMमधून निघाव्यात यासाठी देशभरातील २.४ लाख एटीएम रिकॅलिब्रेट करण्यात आली होती. त्यानंतर आता १०० रूपयाची देखील नवीन नोटा चलनात येणार आहे. त्यासाठी देशभरातील २.४ लाख एटीएम रिकॅलिब्रेट करावे लागणार आहेत. यासाठी १०० कोटी खर्च येणार आहेत. FSSचे प्रमुख व्ही. बालसुब्रम्हण्यम यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. जुन्या नोटा आणि नवीन नोटा यांची तांत्रिक दृष्ट्या माहिती घेतल्यानंतर त्यासंदर्भातील निर्णय होणार असल्याचे सुब्रम्हण्यम यांनी म्हटले आहे. नवीन १००च्या नोटांसाठी एटीएम रिकॅलिब्रेट करण्यात येणार असून त्यासाठी किमान १२ महिन्यांचा वेळ लागणार आहे. १०० रूपयाची जांभळ्या कलरची नोट चलनात येणार असल्याचे आरबीआयने जाहीर केले आहे.

नोटाबंदीनंतर ATM रिकॅलिब्रेट

नोव्हेंबर २०१६ साली नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. ५०० आणि हजारच्या नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर ५०० आणि १०००च्या नोटा या चलनातून बाद झाल्या. त्यानंतर २००० हजार,५००रूपये आणि २००च्या नव्या नोटा चलनात आल्या. एटीएमच्या माध्यमातून नव्या नोटा लोकांपर्यंत पोहोचाव्या यासाठी देशभरातील २.४ लाख ATMचे रिकॅलिब्रेट करण्यात आले. त्यावेळी देखील करोडो रूपयांचा खर्च करण्यात आला होता. आता देखील १००ची नवीन नोटा चलनात येणार असल्याने त्यासाठी देखील आता १०० कोटींचा खर्च येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -