घरदेश-विदेशजम्मू-काश्मीरच्या विभाजनानंतर रेडिओनेसुद्धा केला 'हा' बदल

जम्मू-काश्मीरच्या विभाजनानंतर रेडिओनेसुद्धा केला ‘हा’ बदल

Subscribe

दरम्यान आजपासून अस्तित्वात आलेल्या जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशच्या नायब राज्यपालदाची गिरीशचंद्र मुम्रू यांनी तर राधा कृष्ण माथूर यांनी लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या नायब राज्यपालपदाची आज शपथ घेतली.

कलम ३७० रद्द झाल्यानंतर शुक्रवारपासून जम्मू-काश्मीर राज्याचे विभाजन होऊन ‘जम्मू-काश्मीर’ आणि ‘लडाख’ हे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले. जम्मू-काश्मीरच्या विभाजनानंतर रेडिओनेसुद्धा काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आज जम्मू-काश्मीरचे विभाजन झाले. त्यानुसार आजपासून अस्तित्वात आलेल्या जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशच्या नायब राज्यपालदाची गिरीशचंद्र मुम्रू यांनी तर राधा कृष्ण माथूर यांनी लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या नायब राज्यपालपदाची आज शपथ घेतली.

रेडिओ करणार हा बदल

जम्मू-काश्मीरचे विभाजन होऊन ‘जम्मू-काश्मीर’ आणि ‘लडाख’ हे दोन केंद्रशासित प्रदेश शुक्रवारपासून अस्तित्वात आले. त्यामुळे रेडिओनेसुद्धा काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जम्मू, श्रीनगर आणि लेह या रेडिओ केंद्रांची नावं बदलणे तसेच घोषणेतही बदल करण्यात आला आहे. आजपासून जम्मू-काश्मीर आणि लडाख मधील रेडिओ केंद्रांवरून ‘ऑल इंडिया रेडिओ’ किंवा ‘ये आकाशवाणी है’ अशी घोषणा ऑल इंडिया रेडिओकडून आजपासून केली जाणार आहे. यापूर्वी जम्मू, श्रीनगर आणि लेह या रेडिओ केंद्रांवरुन ‘रेडिओ काश्मीर’ अशी होणारी घोषणा ही इथल्या रेडिओची ओळख बनली होती. पण विभाजनानंतर ही ओळख बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घोषणेसोबतच येथील रेडिओ केंद्रांची नावेही बदलली जाणार आहेत. त्यानुसार ऑल इंडिया रेडिओ जम्मू, ऑल इंडिया रेडिओ श्रीनगर आणि ऑल इंडिया रेडिओ लेह अशी केली जाणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -