घरदेश-विदेशहाफ मर्डर करणाऱ्या कैद्याचं जेलमध्ये थाटात लग्न

हाफ मर्डर करणाऱ्या कैद्याचं जेलमध्ये थाटात लग्न

Subscribe

पंजाबच्या जेलमध्ये एका कैद्याचं बुधवारी लग्न लागलं. त्याच्या लग्नासाठी जेलमध्येच लग्न मंडप तयार करण्यात आला होता. विशेष म्हणजे त्या जेलमध्ये कुख्यात गुंड कैद आहेत.

तुम्ही विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नाबाबत ऐकलं असेल किंवा त्यापेक्षा जास्त फार फार तर उद्योगपती मुकेश अंबानीच्या मुलीच्या शाही लग्नसोहळ्याबाबत ऐकलं असेल. मात्र जेलमध्ये लागलेल्या लग्नाविषयी कधी ऐकलं नसेल. होय जेलमध्येच लग्न! पंजाबच्या जेलमध्ये एका कैद्याचं बुधवारी लग्न लागलं. त्याच्या लग्नासाठी जेलमध्येच लग्न मंडप तयार करण्यात आला होता. विशेष म्हणजे त्या जेलमध्ये कुख्यात गुंड कैद आहेत. मात्र, तरीही कैद्याच्या लग्नाचं शिवधनुष्य पोलिसांनी पेललं. या कैद्याच्या लग्नासाठी मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.


हेही वाचा – याला चप्पल सापडेना आणि नेटिझन्सचे विनोद थांबेनात!

- Advertisement -

काय आहे नेमकं प्रकरण?

हा लग्न समारंभ पंजाबच्या नाभा जेलमध्ये संपन्न झाला. या जेलमध्ये मनदीप सिंग हा कैदी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. पंजाब आणि हरियाणा हाय कोर्टाच्या आदेशानुसार ३० ऑक्टोबर रोजी जेलमध्येच त्याचं लग्न समारंभ पार पडलं. आपल्या लग्नासाठी त्याने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. अखेर सुनावणीत हायकोर्टाने त्याला जेलमध्ये लग्न करण्याची परवानगी दिली. जेलमध्ये एखाद्या कैद्याचं लग्न लागणं, ही देशातील पहिलीच वेळ आहे.


हेही वाचा – ‘अभी मूड नही है…’, असे म्हणत सलमानने ६ दिवस आधी मोडले…

- Advertisement -

 

नवरी थाटात जेलमध्ये आली

जेलकैदी मनदीप सिंगची होणारी पत्नी जेलमध्ये मोठ्या थाटात आली. नवरी एका लाल रंगाच्या कारमार्फत जेलला आली. जेव्हा जेल परिसरात तिची गाडी आली तेव्हा पोलीस एकदम सतर्क झाले. पोलिसांच्या सुरक्षेसह जेलमध्ये कैद्याचा लग्न समारंभ पार पडला. लग्नासाठी दोन्ही परिवारांकडून आठ सदस्य आले होते. त्यांच्या साक्षीने मनदीपने नवरी मुलीच्या गळ्यात मंगळसुत्र बांधले.


हेही वाचा – लघुशंकेसाठी फलंदाज मैदान सोडून पळाला; व्हिडिओ व्हायरल


 

हाफ मर्डरच्या गुन्ह्याची शिक्षा

मनदीप सिंगने दोन हाफ मर्डर केले आहेत. यामध्ये त्या दोन्ही जणांना जागेवरच मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोर्टाने त्याला जन्मठेपाची शिक्षा ठोठवली आहे. या गुन्ह्याअगोदरही मनदीपच्या विरोधात आठ गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -