घरमहाराष्ट्रकानडी भक्ताची विठुरायाला लाखोंची भेट

कानडी भक्ताची विठुरायाला लाखोंची भेट

Subscribe

कर्नाटकाच्या एका भक्तानेच विठुरायांना तब्बल २५ लाख रुपयांचा सोन्याचा चंद्रहार अर्पण केला आहे. हा चंद्रहार पाऊन किलोचा आहे.

महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकातही विठुरायांचे लाखो भक्त आहेत. दरवर्षी ते विठुरायांच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात. कर्नाटकात विठुरायाची ओळख ही ‘कानडा विठ्ठलु, कर्नाटकु’ अशी आहे. आता कर्नाटकाच्या एका भक्तानेच विठुरायांना तब्बल २५ लाख रुपयांचा सोन्याचा चंद्रहार अर्पण केला आहे. हा चंद्रहार पाऊन किलोचा आहे. या भक्ताचे नाव राघवेंद्र राव असे आहे. राव बेंगळुरु येथे वास्तव्यास असून ते हॉटेल व्यावसायिक आहेत. या चंद्रहारावर अत्यंत बारकाईने पैलू पाडण्यात आले आहेत. त्यामुळे चंद्रहार फार आकर्षक दिसत आहे.

हेही वाचा – आणि मुख्यमंत्र्यांनी घरीच केली विठ्ठलाची पूजा!

- Advertisement -

म्हणून विठुरायांना दिला चंद्रहार भेट

राघवेंद्र राव यांनी सांगितल्यानुसार, एकदा त्यांच्या स्वप्नात विठुराया आले होते. त्यानंतर राव यांनी विठुरायांसाठी सोन्याचा चंद्रहार भेट म्हणून देण्याचा इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांनी हा चंद्रहार बनवला. जीएसटी आणि कारागिरांच्या खर्चासहा राव यांना हा चंद्रहार ३४ लाख रुपयांना पडला आहे. पंढरपूरच्या विठुरायांच्या दर्शनासाठी लाखो भक्तगण येतात. प्रत्येक भक्त आपल्या परिने होईल तशी भेचवस्तू विठुरायांना देण्याचा प्रयत्न करतो. मात्र, राव यांनी दिलेली तब्बल २५ लाख रुपयांची भेटवस्तू ही सर्वात मोठ्या भेटवस्तूंपैकी एक आहे.


हेही वाचा – पंढरपुरात यंदा मुख्यमंत्र्यांनी नाही तर ‘यांनी’ केली महापूजा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -