घरदेश-विदेशबंगळुरूत एअर टॅक्सीने घेतले यशस्वी उड्डाण; पुढच्या वर्षी सेवेत?

बंगळुरूत एअर टॅक्सीने घेतले यशस्वी उड्डाण; पुढच्या वर्षी सेवेत?

Subscribe

या एअर टॅक्सीचे वैशिष्ट्ये म्हणजे १६० किमी वेगाने ही २०० किमी अंतर पार करु शकते. ही टॅक्सी व्यवस्थितरित्या उड्डाण व लॅंडींग करु शकते. २०० किलो वजन वाहून नेण्याची क्षमता या टॅक्सीत आहे. त्यामुळे पायलट व दोन प्रवासी यातून प्रवास करु शकतात. या टॅक्सीद्वारे रस्ते वाहतुकीपेक्षा अधिक वेगाने प्रवासी व माल वाहतूक केली जाऊ शकते. या टॅक्सीचे भाडे सध्याच्या टॅक्सीच्या तीने ते चारपट असेल असा अंदाज आहे. 

बंगळूरूः वीजेवर चालणाऱ्या एअर टॅक्सीने बंगळूरु येथे यशस्वी उड्डाण घेतले. त्यामुळे ही एअर टॅक्सी सन २०२४ च्या शेवटाला किंवा सन २०२५ च्या सुरुवातीला सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या या एअर टॅक्सीची चाचणी सुरु आहे.

बंगळूरू येथील येलहंका येथे हवाई दलाचा एअरो इंडिया शो सुरु आहे. यामध्ये हवाई दलाची प्रात्यक्षिके सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी १३ फेब्रुवारीला या शोचे उद्घाटन केले होते. या शोमध्ये वीजेवर उडणाऱ्या एअर टॅक्सीची प्रात्यक्षिके झाली. ही प्रात्यक्षिके सर्वांनाच अचंबित करणारी होती. एअर टॅक्सीच्या यशस्वी उड्डाणामुळे ही लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होण्याचे संकेत मिळत आहेत.

- Advertisement -

या एअर टॅक्सीचे वैशिष्ट्ये म्हणजे १६० किमी वेगाने ही २०० किमी अंतर पार करु शकते. ही टॅक्सी व्यवस्थितरित्या उड्डाण व लॅंडींग करु शकते. २०० किलो वजन वाहून नेण्याची क्षमता या टॅक्सीत आहे. त्यामुळे पायलट व दोन प्रवासी यातून प्रवास करु शकतात. या टॅक्सीद्वारे रस्ते वाहतुकीपेक्षा अधिक वेगाने प्रवासी व माल वाहतूक केली जाऊ शकते. या टॅक्सीचे भाडे सध्याच्या टॅक्सीच्या तीने ते चारपट असेल असा अंदाज आहे.

हवाई दलात्या एअरो इंडिया शोमध्ये जेट सुटचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. पॅराशुटप्रमाणे जेट सुट घातल्यानंतर जेटसारखे हवेत उडता येते. ५० ते ६० किमी वेगाने याद्वारे उड्डाण घेता येते. अंदाजे सात किंवा नऊ मिनिटांत १० किमी अंतर पार करता येते. १३ फेब्रुवारीला सुरु झालेला एअरो इंडिया शो १७ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. यामध्ये शंभर देशांच्या सुमारे ७०० संरक्षण कंपन्या व त्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या शोमध्ये होणारी प्रात्यक्षिके रोमांचक आहेत.

- Advertisement -

दरम्यान, गेल्या वर्षी भारतीय नौदलातर्फे महाराष्ट्रातील विधानसभ आणि विधान परिषद सदस्यांसाठी ‘एक दिवस समुद्रावर’ (Day at Sea) या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाअंतर्गत पश्चिम नौदल कमांडने विविध थरारक प्रात्यक्षिके सादर केली. समाजातील सर्व घटकांमध्ये, विशेषतः किनारपट्टीवरच्या राज्यांमध्ये समुद्राविषयी अधिकाधिक जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘एक दिवस समुद्रावर’ या कार्यक्रमात 25 आमदारांसह 125 पाहुणे आणि अधिकाऱ्यांनी पश्चिम ताफ्यातील आयएनएस चेन्नई, आयएनएस विशाखापट्टणम आणि आयएनएस तेग या आघाडीच्या युद्धनौकांवरून नौसेनेच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती घेतली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -