घरदेश-विदेशएअरसेल-मॅक्सिस प्रकरण: पी. चिदंबरम यांच्यासह ९ जणांविरोधात चार्जशीट दाखल

एअरसेल-मॅक्सिस प्रकरण: पी. चिदंबरम यांच्यासह ९ जणांविरोधात चार्जशीट दाखल

Subscribe

एअरसेल- मॅक्सिस प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यासह ९ जणांविरोधात इडीने चार्जशीट दाखल केली आहे. पटियाला हाऊस कोर्टात आज ईडीने पुरवणी चार्जशीट दाल केली आहे. याप्रकरणाचा ईडी आणि सीबीआय या दोन्ही तपास यंत्रणा तपास करत आहेत.

एअरसेल- मॅक्सिस प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यासह ९ जणांविरोधात इडीने चार्जशीट दाखल केली आहे. पटियाला हाऊस कोर्टात आज ईडीने पुरवणी चार्जशीट दाल केली आहे. या चार्जशीटमध्ये काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचे नाव आघाडीवर आहे. या व्यतिरिक्त इतर ८ जणांची देखील नावं आहेत. येत्या २६ नोव्हेंबरला यावर सुनावणी होणार आहे. याप्रकरणी सीबीआयने देखील वेगळी पूरवणी चार्जशीट यापूर्वी दाखल केली आहे. ईडीने दाखल केलेल्या या चार्जशीटमध्ये पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांचा सीए भास्कर रमणचे देखील नाव आहे. याप्रकरणाचा ईडी आणि सीबीआय या दोन्ही तपास यंत्रणा तपास करत आहेत.

- Advertisement -

याप्रकरणात एकूण १८ आरोपी 

यापूर्वी जुलै २०१८ मध्ये दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाना एयरसेल-मॅक्सिस प्रकरणामध्ये दाखल केलेल्या पूरवणी चार्जशीटमध्ये सीबीआयने पी चिदंबरम यांना आरोपी म्हटले होते. याप्रकरणात चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरमवर आधीपासूनच आरोप आहेत. आता या प्रकरणामध्ये एकूण १८ आरोपी आहेत. चिदंबरम आतापर्यंत हेच बोलत आले आहेत की, याप्रकरणात त्यांनी काहीच गुन्हा केला नाही.

पी. चिदंबरम यांचावर हा आहे आरोप

पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांनी २००६ साली एअरसेल-मॅक्सिस करारांतर्गत विदेशी गुंतवणूक संवर्धन बोर्ड (एफआयपीबी) ला मंजुरी दिली होती. ३५०० कोटींचा हा करार असून सीबीआय आणि ईडी या प्रकरणाचा तपास करीत आहे. हा करार झाला त्यावेळी पी. चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री होते. एअरसेल-मॅक्सिस करार करण्यासाठी तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी कॅबिनेट कमिटीला अंधारात ठेवले आणि त्यांच्या परवानगीशिवाय या कराराला मंजुरी दिली, असा त्यांच्यावर आरोप आहे.

- Advertisement -

जाणीवपूर्वक चिदंबरम यांना फसवले

दरम्यान पी चिदंबरम यांना जाणीवपूर्वक फसवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ईडीवर सरकारचे अंकुश असून सरकारविरोधात बोलणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम ईडी करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे नेते हरीश रावत यांनी हा आरोप केला आहे.

संबंधित बातमी – 

एअरसेल-मॅक्सिसप्रकरणी पी. चिदंबरम आरोपी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -