घरदेश-विदेशएअरसेल-मॅक्सिसप्रकरणी पी. चिदंबरम आरोपी

एअरसेल-मॅक्सिसप्रकरणी पी. चिदंबरम आरोपी

Subscribe

एअरसेल-मॅक्सिसप्रकरणी पी. चिदंबरम आणि मुलगा कार्ती विरोधात सीबीआयने आरोपत्र दाखल केले आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान सीबीआयवर दबाव असल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला.

एअरसेल – मॅक्सिसप्रकरणी सीबीआयने पटियाला हाऊस कोर्टामध्ये गुरूवारी आरोपपत्र दाखल केले. यावेळी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, मुलगा कार्ती चिदंबरमसह १८ आरोपींच्या नावाचा समावेश आहे. विशेष सीबीआय न्यायाधीश ओ. पी. सैनी यांच्यासमोर सीबीआयने आरोपत्र दाखल केले आहे. याप्रकरणाची ३१ जुलै रोजी होणार आहे. चिदंबरम यांच्यासह पुत्र कार्ती आणि काही सरकारी अधिकाऱ्यांना आरोपी करण्यात आले आहे. यातील काही अधिकारी सेवेत आहेत. पी. चिदंबरम यांचे नाव एअरसेल-मॅक्सिसप्रकरणी आल्याने काँग्रेसला धक्का बसला आहे. एअरसेल-मॅक्सिसप्रकरणी पैशाचा गैरव्यवहार झाल्याचे आरोपपत्रामध्ये म्हटले आहे. ज्यावेळी पैशांचा गैरव्यवहार झाला त्यावेळी पी. चिदंबरम हे अर्थमंत्री होते. एअरसेल-मॅक्सिस आणि आयएनएक्स मीडिया कंपन्यांच्या करारामध्ये चिदंबरम यांची भूमिका काय याचा तपास सध्या सीबीआय करत आहे.

‘सीबीआयवर दबाव’

दरम्यान आपल्यावर कारवाई करण्यासाठी सीबीआयवर दबाव असल्याचा आरोप पी. चिदंबरम यांनी केला आहे. शिवाय आपण आता जोमाने खटला लढणार असून सत्य समोर येईल असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. तसेच प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने आपण यावर अधिक भाष्य करणार नसल्याचे चिदंबरम यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -