घरटेक-वेक'या' तीन स्मार्टफोन्सना भारतीयांची पसंती

‘या’ तीन स्मार्टफोन्सना भारतीयांची पसंती

Subscribe

भारतीय स्मार्टफोन बाजारात चायनीज मोबाईल कंपनी वनप्लसने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे. सातत्याने भारतीय बाजारात ही कंपनी पहिल्या क्रमांकावर आहे. हाँग काँग येथील कंपनी काऊंटरपॉईंटने याबाबत एक सर्वेक्षण केले. कंपनीच्या अहवालानुसार वनप्लस कंपनी या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत पहिल्या क्रमांकावर होती. परंतु आता वर्षाच्या शेवटपर्यंत कंपनीने त्यांचे पहिले स्थान कायम राखले आहे. भारतात होणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये ३० टक्के वाटा एकट्या वनप्लसचा आहे. सर्वेक्षणातून असे निष्पन्न झाले आहे. कंपनीने सोशल मीडियावर केलेल्या जबरदस्त मार्केटिंगचा मोठा फायदा झाला आहे. यंदा वनप्लस कंपनीचा वनप्लस ६ हा फोन लाँच झाला. या फोनने अक्षरशः वर्चस्व गाजवले. आता पुढील महिन्यात येणारा वनप्लस 6T देखील लोकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास वनप्लस कंपनीला आणि भारतीय मार्केटचा अभ्यास करणाऱ्या कंपन्यांना वाटतो. वनप्लसला सॅमसंगने चांगलीच टक्कर दिली आहे. सॅमसंग कंपनी भारतीय बाजारात दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. भारतीय स्मार्टफोन मार्कटचा २८ टक्के हिस्सा सॅमसंगने व्यापला आहे. सॅमसंगच्या पाठोपाठ क्रमांक लागतो अॅपलचा. भारतीय मार्केटमध्ये विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोन्सपैकी २५ टक्के स्मार्टफोन्स हे आयफोन आहेत. असे सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे. पहिल्या सहामाहित अॅपलचे शेअर्स केवळ १४ टक्के होते. परंतु आता ते शेअर्स २५ टक्के झाले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये अॅपलने दोन फोन लाँच केले त्यामध्ये अॅपल आयफोन एक्सएस आणि आयफोन एसएस मॅक्स या फोन्सचा समावेश आहे.

कसा आहे वनप्लस ६

वनप्लस ६ मध्ये ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल मेमरी उपलब्ध आहे. फोनची किंमत ३४,९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम २५६ जीबी इंटरनल मेमरी असणाऱ्या फोनची किंमत ३९,९९९ इतकी आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन वॉटर रेजिस्ट्ंट असल्याने पाण्यात पडला तरी तो खराब होणार नाही. वन प्लस ६ ला ६.२८ इंचाचा डिस्प्ले आहे. २.८ गिगाहार्डजचा ऑक्टाकोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. ३३०० मिलिअॅम्पियर्सची बॅटरीदेखील देण्यात आली आहे. यामध्ये ३ कॅमेरे देण्यात आले आहेत. २० आणि १६ मेगापिक्सलचे रिअर कॅमेरे असतील, तर फ्रंट कॅमेरा २० मेगापिक्सलचा असेल.

- Advertisement -

सॅमसंग गॅलक्सी नोट ९

सॅमसंग गॅलेक्सी नोट ९ या फोनमध्ये ६ जीबी रॅम व १२८ जीबी इंटरनल मेमरी आणि ८ जीबी रॅम व ५१२ जीबी इंटरनल मेमरी असे दोन मोबाईल आहेत. दोन्ही मोबाईलमध्ये मायक्रो एसडी कार्डची सुविधा असून एक्स्पांडेबल मेमरी ५१२ जीबीपर्यंतची आहे. ६ जीबी रॅम व १२८ जीबी मेमरी असलेल्या फोनची किंमत ६७ हजार रुपये तर ८ जीबी रॅम व ५१२ जीबी मेमरी असलेल्या फोनची किंमत ८४ हजार ९०० रुपये इतकी आहे.

हे वाचा – धोनी निवृत्त हो – भाजप मंत्री, नेटिजन्सनी घेतला समाचार

- Advertisement -

सॅमसंग गॅलक्सी नोट ए८ स्टार

सैमसंग गैलेक्सी ए8 स्टार या मोबाईलमलची किंमत ३४ हजार ९९० रुपये इतकी आहे. ६ जीबी रॅम उपलब्ध आहे. ६४ जीबी इंटरनल मेमरी यामध्ये उपलब्ध आहे. ६.३ इंच इतक्या लांबीचा डिसप्ले आहे. मोबाईलमध्ये २.२ गिगाहर्ट्जचा ऑक्टा कोअर प्रेसेसर आहे. मोबाईलमध्ये तीन कॅमेरे आहेत. १६ मेगापिक्सल आणि २४ मेगापिक्सल्सचे दोन रिअर कॅमेरे आणि २४ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -