घरदेश-विदेशअमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय मागे; २३ जूनपासून यात्रा सुरू

अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय मागे; २३ जूनपासून यात्रा सुरू

Subscribe

येत्या २३ जूनपासून ही यात्रा सुरू होणार आहे. पण कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यावर पुढील निर्णय घेतला जाईल, जम्मू-काश्मीर राजभवनच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोना व्हायरसमुळे संपुर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय अमरनाथ श्राईन बोर्डाने घेण्यात आला होता. मात्र हा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरच्या माहिती संचालनालयाने यासंदर्भात पत्रक जारी केले होते. ते मागे घेण्यात आले आहे. कोरोना व्हायरसमुळे यंदाची अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आल्याचे या पत्रकात म्हटले होते. पण सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे. येत्या २३ जूनपासून ही यात्रा सुरू होणार आहे. पण कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यावर पुढील निर्णय घेतला जाईल, जम्मू-काश्मीर राजभवनच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

- Advertisement -

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल आणि श्री अमरनाथजी श्राइन बोर्डचे अध्यक्ष गिरीशचंद्र मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय अमरनाथ श्राईन बोर्डाकडून घेतला आला. मात्र, जरी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला असला तरी, देशातील व्यवहार कधीपर्यंत बंद राहतील हे अद्याप स्पष्ट नाही. यात्रेकरूंच्या सुरक्षेचा सरकार आणि प्रशासनाकडून प्राधान्याने विचार करण्यात येत आहे, असे नायब राज्यपाल जी. सी. मुर्मू यांनी सांगितले.

बाबांच्या भक्तांसाठी ऑनलाईन दर्शन 

यंदाची अमरनाथ यात्रा शक्य नसल्याचा निर्णय अमरनाथ देवस्थान मंडळाने घेतला. पण बाबा अमरनाथ यांची प्रथम पूजा आणि अंतिम पूजा पारंपरिक हर्ष आणि उल्ल्हासात केली जाईल, असेही मंडळाने निश्चित केले. बाबा अमरनाथची पूजा आणि शिवलिंगचे दर्शन घेण्यासाठी जगभरातून यात्रेकरू येतात. यामुळे भाविकांना ऑनलाइन दर्शन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णयही अमरनाथ देवस्थान मंडळाने घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -