घरदेश-विदेशAmbedkar Jayanti: 'सरकारी कर्मचारी हे शाळकरी मुलांसारखे', मद्रास उच्च न्यायालयाने फटकारले म्हणाले,...

Ambedkar Jayanti: ‘सरकारी कर्मचारी हे शाळकरी मुलांसारखे’, मद्रास उच्च न्यायालयाने फटकारले म्हणाले, सुट्ट्यांवर नेहमी लक्ष …

Subscribe

सरकारी कर्मचारी आणि शाळकरी मुले यांच्यात कोणताही फरक नाही. सरकारी कर्मचारी हे शाळकरी मुलांसारखे असतात. सरकारी कर्मचारी हे नेहमी सुट्ट्या आणि कामातून सूट यावर लक्ष ठेवून असतात, असं मत मद्रास उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे.

सरकारी कर्मचारी आणि शाळकरी मुले यांच्यात कोणताही फरक नाही. सरकारी कर्मचारी हे शाळकरी मुलांसारखे असतात. सरकारी कर्मचारी हे नेहमी सुट्ट्या आणि कामातून सूट यावर लक्ष ठेवून असतात, असं मत मद्रास उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे.

मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाचे न्यायमूर्ती जीआर स्वामिनाथन यांनी आंबेडकर जयंतीनिमित्त जाहीर केलेल्या राष्ट्रीय सुट्टीशी संबंधित याचिकेवर सुनावणी करताना सरकारी कर्मचाऱ्यांना फटकारले आहे.

- Advertisement -

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जीआर स्वामीनाथन म्हणाले की, आंबेडकर जयंतीनिमित्त नागरिकांच्या भावनांचा आदर करण्यासाठी राज्य सरकारने १४ एप्रिल ही राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली. ते म्हणाले की, डॉ.बी.आर.आंबेडकरांनाच लोकांनी अधिकाधिक काम करावे असे वाटले असते. ( Ambedkar Jayanti Government employees like school children Madras High Court slams  )

( हेही वाचा:  ठाकरे पिता-पुत्रांसह संजय राऊत दिल्ली उच्च न्यायालयात राहणार हजर? )

- Advertisement -

कोणत्या याचिकेवर सुनावणी झाली?

कुडनकुलम न्यूक्लियर पॉवर प्लांटच्या कर्मचारी संघटनेने दाखल केलेल्या याचिकेवर मदुराई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. सरकारी कर्मचारी हे शाळकरी मुलांसारखे आहेत, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यांच्यासाठी सुट्टी मिळणे आणि कामातून सूट मिळणे हे नेहमीच स्वागतार्ह आहे.

या याचिकेत कुडनकुलम न्यूक्लियर पॉवर प्लांटच्या कर्मचारी संघटनेने त्यांना १४ एप्रिल २०१८ रोजी केलेल्या कामासाठी दुप्पट भत्ता मिळावा, अशी मागणी केली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या वतीने या प्रकल्पाच्या संचालकांना आर्थिक लाभ देण्याचे निर्देश दिले होते.

‘सुनावणीदरम्यान हायकोर्टाने सांगितले की, डॉ. आंबेडकर ही अशी व्यक्ती होती, ज्यांना त्यांच्या जयंतीनिमित्त सुट्टी जाहीर करण्याऐवजी लोकांनी कठोर परिश्रम करावे अशी इच्छा होती. आपण फक्त त्यांच्या प्रतीकांच्या प्रणालीचे अनुसरण केले. कार्यक्षमतेपेक्षा शिष्टाचारावर त्यांचा विश्वास होता. देशाला प्रतीकात्मकता आणि भावनांची खूप काळजी आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

कोर्ट म्हणाले, कार्यक्षमतेपेक्षा सौजन्य ही आमची ओळख आहे. भारतरत्न डाॅक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्याप्रमाणेच आंबेडकरांनी माझ्या मृत्यूच्या दिवशी सुट्टी जाहीर करू नका, त्याऐवजी तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर एक दिवस अतिरिक्त काम करा,” असे म्हटल्याचे न्यायालय यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -