घरताज्या घडामोडी2024 च्या कृती आराखड्याबाबत अमित शहा आणि जेपी नड्डा यांची केंद्रीय मंत्र्यांसोबत...

2024 च्या कृती आराखड्याबाबत अमित शहा आणि जेपी नड्डा यांची केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक

Subscribe

येत्या अगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आपल्या तयारीला सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची ब्लू प्रिंट तयार करण्यास सुरुवात केली आहे.

येत्या अगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आपल्या तयारीला सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची ब्लू प्रिंट तयार करण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात आज प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत अमित शहा, जेपी नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्रीही उपस्थित होते. (amit shah and jp nadda held a meeting with union ministers regarding the action plan for 2024)

मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला ज्या 144 जागांवर फार कमी फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. त्या 144 जागांसाठी पक्ष नियोजन करत आहे. 2019 मध्ये भाजपने 543 लोकसभा जागांपैकी 303 जागा जिंकल्या. विरोधी पक्षात काँग्रेसला सर्वाधिक 53 जागा मिळाल्या.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाचे प्रमुख जेपी नड्डा आणि मुख्य रणनीतीकार अमित शहा यांनी प्रत्येक मंत्र्याला काही जागांवर लक्ष केंद्रित करण्याची जबाबदारी दिली आहे. त्यांना मतदारसंघात भेटी देऊन जमिनीचा आढावा घेण्यास आणि अभिप्राय देण्यास सांगण्यात आले आहे.

याशिवाय, प्रत्येक जागेवर भाजपची रणनीती त्यांच्या तळागाळातील माहितीवर आधारित असणार असल्याचे समजते. तसेच, पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मंत्र्यांनाही मदत करण्यास सांगण्यात आल्याचे समजते. या आणि इतर प्रतिक्रियांमुळे बूथ मजबूत करण्यासाठी योग्य रणनीती तयार करण्यात पक्षाला मदत होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अस्लम शेख आणि आदित्य ठाकरेंचा मार्वे स्टुडिओ घोटाळ्याला आशीर्वाद, किरीट सोमय्यांचा आरोप

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -