घरदेश-विदेशमी शेतकरी आंदोलनाला पवित्र मानतो, पण...

मी शेतकरी आंदोलनाला पवित्र मानतो, पण…

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं. मी शेतकरी आंदोलन पवित्र मानतो पण आंदोलनजीवी वातावरण दुषित करत आहेत अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. दोन दिवसांपूर्वी मोदी यांनी आंदोलनजीवी या शब्दाचा उल्लेख करत विरोधकांवर निशाणा साधला. त्यानंतर मोदींवर टीकेची झोड उठली. शेतकरी आंदोलकांना आंदोलनजीवी म्हटलं अशी टीका शेतकरी आदोलकांनी केली होती. या पार्श्वभूमीवर मोदींनी आज हे विधान केलं.

पंतप्रधान मोदींनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर चर्चेदरम्यान उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तरं दिली. मी शेतकरी आंदोलन पवित्र मानतो. परंतु आंदोलनजीवींकडून शेतकऱअयांचं पवित्र आंदोलन बदनाम केलं जातंय, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात केली. कृषी कायद्यांवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की या कोरोना काळात तीन कृषी कायदेही आणण्यात आले. कृषी सुधारणांची ही मालिका अत्यंत महत्वाची आहे. संसदेत झालेल्या चर्चेत, विशेषत: कॉंग्रेसच्या सहकार्‍यांनी कायद्याच्या आशयावर चर्चा करणं अधिक चांगलं झालं असतं, जेणेकरुन देशातील शेतकऱ्यांपर्यंत योग्य गोष्ट पोहोचली असती. पंतप्रधान मोदी म्हणाले की हे आंदोलन करणारे सर्व शेतकरी बंधूंचं हे सदन आहे आणि हे सरकार देखील आदर करतं. पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधल्यानंतर कॉंग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्यासह अनेक कॉंग्रेस नेत्यांनी संसदेत गदारोळ केला.

- Advertisement -

कायद्यात काही बदल करायचा असेल तर आम्ही तो करू. कायद्यांच्या प्रत्येक बाबीवर चर्चा झाली. गोंधळ घालणं हे ठरवून ठेवलेली रणनिती आहे. जो बाहेर गोंधळ सुरु आहे तोच आत सुरु आहे. सत्य रोखण्यासाठी हे लोक गोंधळ घालत आहेत. परंतु हे लोक कोणाचाही विश्वास जिंकू शकणार नाहीत. नवीन कायदा हा कोणासाठीही बंधन नाही. जेथे पर्याय आहे तेथे निषेध करण्याची गरज नाही. आंदोलनजीवी मात्र जाणीवपूर्वक भीती निर्माण करत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.


हेही वाचा – आंदोलनजीवी नवी जमात आलीये, देशानं सावध रहावं – पंतप्रधान मोदी

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -