घर देश-विदेश चांद्रयान - 3 मोहीम प्रक्षेपणाच्या काऊंटडाऊनची घोषणा करणाऱ्या एन. वलरमथींचे निधन

चांद्रयान – 3 मोहीम प्रक्षेपणाच्या काऊंटडाऊनची घोषणा करणाऱ्या एन. वलरमथींचे निधन

Subscribe

मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान – 3 मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शास्त्रज्ञ एन. वलरमथी यांचे निधन झाले आहे. एन. वलरमथी यांचे वयाच्या 64 व्या वर्षी निधन झाले. एन. वलरमथी यांचे चेन्नईमध्ये शनिवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. चांद्रयान – 3 च्या रॉकेट प्रक्षेपणाच्यावेळी काऊंटडाऊन
मागील एन. वलरमथी यांचा आवाज होता.

एन. वलरमथी यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी श्रद्धांजली वाहली. चंद्रशेखर यांनी ट्वीट देखील केली आहे. या ट्वीटमध्ये चंद्रशेखर म्हटले, एन. वलारमथी यांच्या निधनाची बातमी ऐकून खूपच वाईट वाटले. इस्रोमध्ये चांद्रयान – 3 मोहिमेच्या लाँचिंगचे त्यांनी काऊंटडाऊन केले होते आणि त्यांच्या कुटुंब आणि मित्रपरिवाराप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

इस्रोचे माजी संचालक डॉ. पीव्ही व्यंकटकृष्णन यांनी एन. वलारमथी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पीव्ही व्यंकटकृष्ण यांनी ट्वीटमध्ये म्हणाले, चांद्रयान – 3 मोहीम लाँचिंग वेळी एन. वलरमथींचे काऊंटडाऊन घोषणा होती आणि त्यांचा अनपेक्षित मृत्यूच्या बातमी ऐकून मला खूप वाईट वाटते.

- Advertisement -

हेही वाचा – चांद्रयान – 3 संदर्भात इस्रोकडून मोठी अपडेट; “…आता काम पूर्ण”

सहा वर्षापासून काउंटडाऊनची घोषणा

एन. वलरमथी यांनी चांद्रयान – 3 मोहिमेला 30 जुलै रोजी रॉकेट लाँचिंगवेळी त्यांनी घोषणा केली होती. PSLV – C56 रॉकेने 7 सिंगापूर उपग्रहांचे लाँचिंग केले होते आणि गेल्या सहा वर्षापासून एन. वलरमथी यांनी लाँचसाठी काऊंटडाऊनची
घोषणा केली आहे. तसेच देशाच्या पहिला स्वदेशी रडार इमेजिंग उपग्रह असलेल्या RISAT च्या प्रकल्प संचालक होत्या.

- Advertisment -