घरटेक-वेकiPhone खरेदीवर Paytm मॉलची भन्नाट ऑफर

iPhone खरेदीवर Paytm मॉलची भन्नाट ऑफर

Subscribe

ज्या ग्राहकांना  iPhone एक्सएस आणि एक्सएस मॅक्स विकत घ्यायची इच्छा असेल, ते पेटीएम मॉलने दिलेल्या या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

अॅपल कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या नवीन आयफोन्सना, भारतीय बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आहे. iPhone एक्सएस आणि iPhone एक्सएस मॅक्स या दोन फोनना भारतीय ग्राहकांकडून विशेष पसंती मिळते आहे. तुम्हीदेखील  iPhone एक्सएस आणि iPhone एक्सएस मॅक्स विकत घ्यायच्या विचारात असाल पण बजेट कमी असल्यामुळे तुम्ही हा विचार रद्द करणार असाल, तर Paytm मॉलने तुमच्यासाठी एक खास ऑफर आणली आहे. पेटीएम मॉलकडून ग्राहकांना या दोन्ही आयफोनच्या खरेदीवर चांगली सूट देण्यात आली आहे. पेटीएम मॉलने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या फोनच्या एक्सचेंज मूल्याशिवाय ७ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनसही जाहीर केला आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांना  iPhone एक्सएस आणि एक्सएस मॅक्स विकत घ्यायची इच्छा असेल ते पेटीएम मॉलने दिलेल्या या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.


वाचा : व्हॉट्सअॅप iPhone युजर्सना करणार, फेक न्यूजपासून सावध

पेटीएम मॉलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दोन्ही आयफोनच्या वेबसाईटवर आणि Paytm च्या मोबाईल अॅपवर ही एक्सचेंजची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जे ग्राहक या ऑफरद्वारे आयफोनची खरेदी करतील त्यांना २४ तासांच्या आतमध्ये फोनची डिलीव्हरी मिळेल, अशी माहिती पेटीएम मॉलकडून देण्यात आली आहे. पेटीएमच्या माहितीनुसार देशातील २० पेक्षा अधिक शहरांत ही सुविधा मिळणार आहे. आयफोन एक्सएस आणि एक्सएस मॅक्स हे दोनही फोन सध्या ६४ जीबी, २५६ जीबी आणि ५१२ जीबीच्या स्टोरेजमध्ये – सिल्व्हर, गोल्डन आणि स्पेस ग्रे या ३ रंगांमध्ये उपलब्ध आहेत. ज्यांची किंमत अनुक्रमे ९९ हजार ९०० आणि १ लाख ९ हजार ९०० इतकी आहे.

वाचा:  OnePlus कंपनीचा ‘स्मार्ट टीव्ही’ लवकरच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -