Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Article 370 : आधी करीत होती मोदी सरकारवर टीका आता एकदमच बदलले...

Article 370 : आधी करीत होती मोदी सरकारवर टीका आता एकदमच बदलले तिचे सूर; वाचा कोण ती?

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने जम्मू-कश्मीरमधील कलम 370 रद्द केले होते. त्यांच्या या निर्णयावर देशवासीयांपासून तर चक्क विदेशातूनही टीका झाली होती.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर कॉंग्रेससह अनेक पक्ष, संघटनांनी मोदी सरकारवर टीका केली होती. यामध्ये जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेच्या माजी उपाध्यक्षा शेहला रशीद याही मागे नव्हत्या. त्यांनी मोदी सरकारवर उघडपणे टीका केली होती. मात्र, आता त्यांचे सूर काहीसे बदलले आहेत. त्यांनी कश्मीरमधील कलम 370 रद्द करणाऱ्या मोदी सरकारचे कौतूक करण्यास सुरूवात केली असून, या त्यांच्या भूमिकेमुळे अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.(Article 370 Earlier she was criticizing the Modi government now her tone has completely changed Read Who is she?)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने जम्मू-कश्मीरमधील कलम 370 रद्द केले होते. त्यांच्या या निर्णयावर देशवासीयांपासून तर चक्क विदेशातूनही टीका झाली होती. तब्बल चार वर्षानंतर आता या प्रांतात शांती प्रस्थापित होत असून, हळूहळू सर्व व्यव्हार पूर्वपवादर येत आहेत. त्यामुळेच आता जे काही वर्षांपूर्वी मोदी सरकारवरच्या या निर्णयावर टीका करीत होते तेच आता केंद्र सरकारचे कौतूक करीत असल्याचे दिसून येत आहेत. दरम्यान हा निर्णय घेणाऱ्या केंद्र सरकारवर जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेच्या माजी उपाध्यक्षा शेहला रशीद यांनीही कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला विरोध केला होता. मोदी सरकारच्या या निर्णयावर त्यांनी अनेक सार्वजनिक व्यासपीठांवर उघडपणे टीका केली होती. पण, कालांतराने त्यांचा सूर आता बदलत जात असल्याचे दिसून येत आहे. आज त्या मोदी सरकारच्या निर्णयाचे कौतूक केले असून, त्या म्हणत आहेत की, काश्मीरमधील मानवी हक्कांचे तपशील सध्या सुधारत आहेत. सध्याच्या सरकारने काश्मिरी लोकांच्या ओळखीचे संकट एकाच वेळी सोडवले आहे असे म्हणत मोदी सरकावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : नेहरु मेमोरिअल म्युझियम आणि पुस्तकालयाचे नाव बदलल्याने कॉंग्रेसन नेत्याने सुनावले केंद्राला खडे बोल

हवामान संरक्षणाच्या कराराचेही केले कौतूक

शेहला रशीदने फक्त कश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यामुळेच पंतप्रधानाचे कौतूक केले नाही तर काही दिवसांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवामान संरक्षणाबाबत केलेल्या कराराचेही ट्वीट करुन कौतूक केले आहे. त्या म्हणाल्या की, भारत ऐतिहासिकदृष्ट्या प्रदूषण करणारा देश नाही हे लक्षात घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सक्रिय दृष्टिकोन प्रशंसनीय आहे असल्याचे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : साडेतीन हजार मृतांच्या उपचारासाठी 7 कोटींचा खर्च, आयुष्मान भारतवर कॅगचा ठपका

एका झटक्यात मिळवून दिली कश्मीरींना ओळख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे गुणगुण गातांना आणि कश्मीरमधील कलम 370 हटलविल्याच्या निर्णयाचे कौतूक करताना शेहला रशीद यांनी ट्वीटद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाबाबत म्हणाली की, मागील अनेक वर्षापासून आपल्या ओळखीच्या प्रतीक्षेत असलेल्या कश्मीरी नागरिकांना या निर्णयामुळे एका झटक्यात ओळख मिळाली असून, आता कश्मीरमधील येणारी पुढील पिढी याच ओळखीने पुढे जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

- Advertisment -