घर देश-विदेश नेहरु मेमोरिअल म्युझियम आणि पुस्तकालयाचे नाव बदलल्याने कॉंग्रेसन नेत्याने सुनावले केंद्राला खडे...

नेहरु मेमोरिअल म्युझियम आणि पुस्तकालयाचे नाव बदलल्याने कॉंग्रेसन नेत्याने सुनावले केंद्राला खडे बोल

Subscribe

केंद्र सरकारवर निशाणा साधताना खासदार शशी थरून म्हणाले की, नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीचे नाव बदलून पंतप्रधानांचे संग्रहालय आणि ग्रंथालय करण्यावर ही बाब खेदाची आहे.

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशीच म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी केंद्राने नेहरु नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी (NMML) चे नाव बदलून पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय (PMML) असे केले आहे. या नाव बदलाच्या प्रकरणावरून सध्या भाजप विरुद्ध कॉंग्रेस असा सामना रंगला आहे. याच करण्यावरून विरोधक सातत्याने सरकारवर निशाणा साधत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी नाव बदलल्यामुळे केंद्र सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.(Congress leader slams Center for renaming Nehru Memorial Museum and Library)

केंद्र सरकारवर निशाणा साधताना खासदार शशी थरून म्हणाले की, नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीचे नाव बदलून पंतप्रधानांचे संग्रहालय आणि ग्रंथालय करण्यावर ही बाब खेदाची आहे. पंतप्रधानांच्या कल्पनेचे कौतूक करताना ते म्हणाले की, यापूर्वीच्या सर्व पंतप्रधानांच्या कार्यांचे प्रदर्शन करण्यासाठी पंतप्रधानांचे संग्रहालय बांधण्याची कल्पना खरोखरच कौतुकास्पद आहे. मात्र, ही कल्पना चांगली असली तरी मात्र या प्रक्रियेत नेहरू स्मारकाचे नाव बदलणे ही एक छोटीशी कृती आहे. ते म्हणाले की, जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान होते, ते आतापर्यंतचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले आहेत, त्यांचे नाव काढून टाकणे ही छोटी गोष्ट आहे. सरकारला हवे असते तर त्याचे नाव नेहरू मेमोरियल पंतप्रधान संग्रहालय असे ठेवता आले असते. मात्र तसे केल्या गेले नाही. ही कृती दुर्दैवी आहे. तसेच हे आपल्या स्वतःच्या ऐतिहासिक भूतकाळाबद्दल कटुता दर्शवते असे म्हणत त्यांनी केंद्रावर चांगलाच निशाणा साधला.

- Advertisement -

हेही वाचा : साडेतीन हजार मृतांच्या उपचारासाठी 7 कोटींचा खर्च, आयुष्मान भारतवर कॅगचा ठपका

हा आहे पंतप्रधान स्मारकाचा इतिहास

एडविन लुटियन्सच्या इंपीरियल कॅपिटलचा भाग असलेले किशोर मूर्ती भवन हे ब्रिटीश राजवटीत भारताच्या कमांडर-इन-चीफचे अधिकृत निवासस्थान होते. 1948 मध्ये, ब्रिटीश भारताच्या शेवटच्या कमांडर-इन-चीफच्या निर्गमनानंतर, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे अधिकृत निवासस्थान किशोर मूर्ती भवन बनले. सुमारे 16 वर्षे ते येथे राहिले आणि येथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर हे तीन मूर्ती भवन त्यांच्या स्मृतीला समर्पित करण्यात आले. तेव्हापासून ते पंडित नेहरू स्मारक म्हणून ओळखले जाऊ लागले. आता केंद्र सरकारने नेहरू मेमोरियलचे नाव बदलून पीएम म्युझियम आणि सोसायटी असे केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : पंतप्रधान मोदी म्हणाले, तीन दुष्प्रवृत्तींशी लढावे लागेल; काँग्रेसने सांगितला – लड़ने का तरीका…

केंद्रात रंगले राजकारण

नेहरू मेमोरिअल म्युझियम अँड लायब्ररीचे नाव बदलण्याचा कुत्सित प्रयत्न केल्याने आधुनिक भारताचे शिल्पकार आणि लोकशाहीचे प्रहरी पंडित नेहरूंची उंची कमी होऊ शकत नाही. यातून केवळ रा.स्व.संघ आणि भाजपची क्षुद्र मानसिकताच दिसून येते. मोदी सरकारची खुजी मनोवृत्ती हिंदच्या जवाहरचे भारताच्या जडणघडणीतील योगदान कमी करू शकत नाही अशी टीका कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली तर हे संग्रहालय या राजकारणाच्या पलिकडे जाण्याचा प्रयत्न असून, काँग्रेसला मात्र ते दिसू शकत नाही. काँग्रेसचा दृष्टिकोन हा केवळ एका घराण्याचा वारसा जीवंत ठेवण्यापुरता मर्यादित आहे. असे प्रत्युत्तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी दिले आहे.

- Advertisment -