घर महाराष्ट्र बीडमधील शरद पवारांच्या सभेनंतर बदलतील समीकरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा

बीडमधील शरद पवारांच्या सभेनंतर बदलतील समीकरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा

Subscribe

उद्या गुरुवारी (ता. 17 ऑगस्ट) दुपारी 01 वाजता मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची सभा होणार आहे. विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर होणाऱ्या या पहिल्याच राजकीय सभेकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. पक्षाच्या बांधणीकरिता पवारांची पहिली जाहीर सभा ही नाशिक जिल्ह्यातील येवल्यात झाली. त्यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार हे कामाला लागले असून उद्या गुरुवारी (ता. 17 ऑगस्ट) दुपारी 01 वाजता मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची सभा होणार आहे. शिवसेना पक्षाप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील दोन गट पडलेले आहेत. त्यामुळे आता शरद पवार हे पुन्हा एकद पक्षबांधणीच्या कामाला लागलेले आहेत. (Equations will change after Sharad Pawar’s meeting in Beed, claims NCP)

हेही वाचा – शरद पवारांची ही खेळी कशासाठी? मुंडेंच्या बीडमध्ये घेणार जाहीर सभा

- Advertisement -

विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर होणाऱ्या या पहिल्याच राजकीय सभेकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. बीडची जनता पूर्ण ताकदीने देशाचे नेते शरद पवार यांचे जंगी स्वागत करणार, अशी माहिती राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांच्याकडून देण्यात आली आहे. शरद पवार यांच्या या सभेमुळे पक्षाला सोडून गेलेल्या अनेक नेत्यांचे धाबे दणाणले असून या सर्व नेत्यांच्या मनात आगामी निवडणुकीत स्वतःचे डिपॉझिट जप्त होण्याची भीती पसरू लागली आहे व त्यांच्याकडे असलेले कार्यकर्ते देखील उद्या शरद पवार यांच्या सभेला हजेरी लावणार आहेत, अशी माहिती महेश तपासे यांनी दिली.

मराठवाड्यातला बीड जिल्हा हा राजकीयरीत्या अतिशय संवेदनशील जिल्हा आहे. नेहमीच बीड जिल्ह्याने पवारांच्या विचारांना साथ दिली आहे. या जिल्ह्यात त्यांना मानणाऱ्या मतदारांचा फार मोठा वर्ग आहे व ही जनता आज यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असे तपासे यांच्याकडून सांगण्यात आले. बीडच्या जनतेचा आशीर्वाद घेऊन राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सबंध राज्यभर प्रवास करून वेगवेगळ्या ठिकाणी पक्षाच्या निष्ठावंतांना भेटून भाजप विरोधी राष्ट्रवादीची भूमिका जनतेत मांडणार असल्याची कबुली महेश तपासे यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

पक्षाच्या आदेशा विपरीत भाजप सरकारला पाठिंबा देणाऱ्या अनेक आमदारांचे मन परिवर्तन बीडच्या सभेनंतर होण्याची शक्यता तपासे यांनी बोलवून दाखविली व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शरद पवार यांच्यासोबत निष्ठावंतांची फौज उभी राहिलेली आहे व त्याला राज्यातल्या तरुणाईची भरघोस साथ मिळत आहे, असेही राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितले.

- Advertisment -