घरदेश-विदेशAssembly election: १०१ वर्षांच्या आजींनी केले मतदान

Assembly election: १०१ वर्षांच्या आजींनी केले मतदान

Subscribe

मध्यप्रदेशमधील आगर माळवा या जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या मतदानादरम्यान १०१ वर्षांच्या एका आजीबाईंनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.

मध्य प्रदेश आणि मिझोराममध्ये आज विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात झाली. हे मतदान मध्य प्रदेशात २३० जागांसाठी तर मिझोराममध्ये ४० जागांसाठी होणार आहे. त्यापैकी मध्य प्रदेशमध्ये ५ कोटी ४ लाख ९५ हजार २५१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून, यामध्ये २ कोटी ६३ लाख १ हजार ३०० पुरुष, २ कोटी ४१ लाख ३० हजार ३९० महिला आणि १ हजार ३८९ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. दरम्यान, ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार काही वेळापूर्वीच १०१ वर्षांच्या एका आजीबाईंनी मतदान केले. मध्यप्रदेशमधील आगर माळवा या जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या मतदानादरम्यान १०१ वर्षांच्या एका आजींनी त्याचा मतदानाचा हक्क बजावला. शंभरी ओलांडलेल्या या आजींच्या मतदानाचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे. एएनआय वृत्तसंस्थेने या उत्साही आजीबाईंचा फोटो ट्वीटरद्वारे शेअर केला असून, सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या वयातही मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचा जो उत्साह या वृद्ध महिलेने दाखवला आहे, त्याचं देशभरातून कौतुक होत आहे.

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश आणि मिझोराम या दोन्ही राज्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या निवडणुकांमध्ये मध्य प्रदेशात २८९९ तर मिझोराममध्ये २०९ उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत. मिझोराममध्ये एकूण ७ लाख ७० हजार ३९५ नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर, मध्य प्रदेशमध्ये ५ कोटी ४ लाख ९५ हजार २५१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मध्य प्रदेशमध्ये निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या प्रचारसभेत मोठा गोंधळ पाहिला मिळाला. सत्तेसाठी सत्ताधारी पक्ष भाजप आणि कॉंग्रेस पक्ष यांच्यात चुरशीची लढाई बघायला मिळाली. दोन्ही पक्षांमधील राजकीय वादाचे रुपांतर वैयक्तीक पातळीवर येऊन ठेपले होते. प्रचारसभांमध्ये कॉंग्रेस आणि भाजपचे नेते आरोप-प्रत्यारोपांनी कुरघोडी करताना दिसत होते. त्यामुळे आता विजय कुणाचा होईल, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -