घरमुंबईराजावाडी रुग्णालयाच्या परिसेविकेचा अपघाती मृत्यू

राजावाडी रुग्णालयाच्या परिसेविकेचा अपघाती मृत्यू

Subscribe

बायोमेट्रिक परिणामामूळे वेळेवर पोहोचले पाहिजे या दडपणाखाली कामावर येणाऱ्या रासम यांचा अपघाती मृत्यू झाला. या प्रकरणात प्रशासनाला धडा शिकविण्यात यावा असे मत म्युनसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी व्यक्त केले आहे.

घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयाच्या परिसेविकेचा मृत्यू झाला आहे. सीमा रासम यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. आज सकाळी कुर्ला येथे पावणे सात वाजता त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने सीमा यांना धडक दिली यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. सीमा रासम या ५७ वर्षाच्या होत्या.

अज्ञात वाहनाने दिली धडक

राजावाडी रुग्णालयात बायोमेट्रिक पगाराशी लिंक केल्याने सर्व कर्मचाऱ्यांना वेळेवर पोहोचण्याची चढाओढ सुरू असते. सीमा रासम या देखील बायोमेट्रिक करण्यासाठी घाईघाईने जात असताना पाठून आलेल्या वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. या अपघातामध्ये सीमा यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कुर्ला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

- Advertisement -

बायोमेट्रिकमुळे सीमा यांचा मृत्यू

सीमा यांच्या अपघाताची माहिती मिळताच म्युनसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, सहचिटणीस रंजना नेवाळकर,अजय राऊत, वैद्यकीय अधीक्षक विद्या ठाकूर यांनी रुग्णालयात धाव घेत रासम कुटुंबातील सदस्यांना धीर दिला. यावेळी झालेल्या शोक सभेत बायोमेट्रिक परिणामामूळे वेळेवर पोहोचले पाहिजे या दडपणाखाली कामावर येणाऱ्या रासम यांचा अपघाती मृत्यू झाला. या प्रकरणात प्रशासनाला धडा शिकविण्यात यावा असे मत अध्यक्ष बाबा कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी शोकसभेत व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -