घरमनोरंजनप्रियांकाच्या लग्नाची तयारी सुरु

प्रियांकाच्या लग्नाची तयारी सुरु

Subscribe

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोन्स हे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान त्यांचा लग्न सोहळा पार पडणार आहे. प्रियांकाच्या लग्नापूर्वीच्या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. रणवीर सिंग- दीपिकाच्या लग्नानंतर आता प्रियांका चोप्राचे लग्न होणार आहे. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका आणि अमेरिकन सिंगर निक जोन्स हे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान त्यांचा लग्न सोहळा पार पडणार आहे. विवाह सोहळा पहिला ख्रिस्ती पद्धतीने मग हिंदू पद्धतीने पार पाडला जाणार आहे. प्रियांकाचे लग्न जवळ आले असून लग्नाच्या पार्टीला सुरुवात झाली आहे. नुकतेच प्रियांकाच्या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रियांकाचे दिर आणि भाऊजय मुंबईला आले आहेत. या दोघांबरोबर प्रियांकाने रात्रभर पार्टी केली. याचे व्हिडियो सोशल मिडीयावर नुकतेच टाकण्यात आले. या पर्टीत प्रियांका सोबत अभिनेत्री आलिया भट्ट आणि परिणीती चोप्राही सहभागी झाली होती.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -